esakal | वन विभागाकडून होत असलेल्या सुरक्षा कुंपणाचे काम निकृष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

शिवनी ता. किनवट परिसरातील कमकुवत तारकुंपन

वन विभागाकडून होत असलेल्या सुरक्षा कुंपणाचे काम निकृष्ट

sakal_logo
By
विठ्ठल लिंगपूजे

शिवणी ( जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील शिवणी व परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने या जंगलात जंगली प्राण्यांचे वास्तव्यही मोठ्या प्रमाणात आहे. हा परिसर दऱ्या- खोऱ्यात वसलेला असून त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या जमिनी वन परिसरात असल्याने या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिके जंगली प्राण्यापासून वाचवण्यासाठी दिवस- रात्र एक करावी लागते.

शासन स्तरावरुन वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील कंचली, पांगर पहाड, शिवणी या परिसरातील जंगलाच्या भोवताली वन विभागाकडून जंगली प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी जंगलाला तार कुंपण करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून चालू आहे. वनविभागाकडून अवघ्या दोन महिन्यापूर्वी झालेले तार कुंपण जमीनदोस्त होत आहे. सिमटेंचा खांब रोवण्यासाठीचा खड्डा कमी खोलीचा व खांब पक्के करण्यासाठी वापरत असलेले सिमेंट रेतीचा वापर कमी प्रमाणात केल्याने ते खांब तारासह पडत आहेत.

हेही वाचा - खासदार डॉ.प्रीतम मुंढे यांना मिळणार केंद्रात मंत्रीपद?

सिमेंटच्या कामात उन्हाळ्यात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो त्यासाठीही पाण्याचा वापर पूर्ण केला नाही. तयार केलेली कुंपणतार जमिनीवर पडत असल्याने शासनाकडून होत असलेल्या कोट्यावधीचा निधी पाण्यात जाते की काय अशी शंका नागरिकांकडून उपस्थित होत आहे. शासनाकडून शेतकऱ्याला होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी करण्यात येणा-या संरक्षण कुंपणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याने या कामाची संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image