
खासदार डॉ.प्रीतम मुंढे यांना मिळणार केंद्रात मंत्रीपद?
नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारकडून मंत्रीमंडळात लवकरच मोठे फेरबदल (Cabinet reshuffle) केले जाणार आहेत. यात खासदार डॉ.प्रीतम मुंढे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या ६० च्या आसपास मंत्री आहेत. प्रकाश जावडेकर, नरेंद्र तोमर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर दोन-तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. विस्ताराच्या या प्रक्रियेत या मंत्र्यांवरील ताण हलका करून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. (MP Dr. Pritam Mundhe to get ministerial post at Center?) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात विस्तार आणि फेरबदल करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून या आठवडाभरात हा विस्तार होऊ शकतो. विस्ताराच्या प्रक्रीयेत महाराष्ट्रातून डॉ. प्रीतम मुंढे यांचे नाव आघाडीवर असल्याची सुत्रींची माहिती आहे.
कोण आहेत डॉ.प्रीतम मुंढे
दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांच्या द्वितीय कन्या तथा पंकजा मुंढे यांच्या लहान बहीण प्रीतम मुंढे सद्या बीडच्या खासदार आहेत. त्यांनी 2014 ची लोकसभा पोटनिवडणूक लढविली आणि विशेष म्हणजे ही निवडणूक प्रीतम मुंढे यांनी तब्बल सहा लाख 96 हजार 321 मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. भारताच्या लोकसभा निवडणूक इतिहासात ही सर्वोच्च नोंद समजली जाते. पुढे 2019 च्या निवडणूकीत मात्र हा लिड कमी झाला. तरीही प्रीतम मुंढे यांनी राष्ट्रवादी उमेदवाराचा 1 लाख 68 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.

गोपीनाथराव आणि प्रमोद महाजनांकडून राजकारणाचे बाळकडू
वडील गोपीनाथ मुंढे आणि मामा प्रमोद महाजन हे भारतीय राजकारणातील चर्चेतील नेते होते. त्यांच्याकडूनच प्रीतम यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले.

राजकारणात यायची इच्छा नव्हती
प्रीतम मुंढे यांना राजकारणात यायची इच्छा नव्हती, परंतु वडीलांचे दुर्दैवि निधन झाल्याने त्यांना निवडणूक लढवावी लागली. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असल्याने प्रीतम मुंढे खेडोपाडी गेल्यास आरोग्यविषयक तपासणी शिबिरे घेत सर्वसामान्यांशी संवाद साधत असतात.

डॉ. भारती पवार यांचे नावही चर्चेत
राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा असलेल्या डॉ. भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपची वाट धरली होती. गेल्या तीन निवडणुकीत भाजपची सत्ता असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात भाजपने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले होते. राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार भाजपाच्या तिकीटावर विजयी झाल्या. गेल्या वेळी ज्या पक्षाकडून त्या पराभूत झाल्या होत्या त्याच पक्षाच्या तिकिटावर यावेळी त्यांचे खासदारकीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता केंद्रीय मंत्रीमंडळाच्या फेरबदलानंतर डॉ.भारती पवारांना मंत्रीपदाची शक्यता नाकारता येत नाही.
MP Dr. Pritam Mundhe to get ministerial post at Center?