esakal | नायगाव येथील 'डेमो हाऊस' चे काम प्रगतीपथावर
sakal

बोलून बातमी शोधा

नायगाव तालुक्यातील डेमो घराचे बांधकाम

नायगाव येथील 'डेमो हाऊस' चे काम प्रगतीपथावर

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : प्रधानमंत्री आवास योजनेचे ग्रामीण भागात बांधण्यात येणारे घरकुल हे लाभार्थ्यांना राहण्यासाठी सोईस्कर व लाभार्थी स्नेही आणि गुणवत्तापूर्ण व्हावे. यासाठी भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन घरकुल डिझाइन्स विकसित केले गेले आहे. स्थानिक परिस्थितीला अनुकुल असे घरकुल हे कसे असावे यासाठी नायगाव पंचायत समिती डेमो हाऊस (प्रात्यक्षिक घरकुल) बांधत आहे. त्याचे काम प्रगतीपथावर असून बांधकाम पुर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना भेट देण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने सर्वांसाठी घरे २०२२" हे धोरण जाहीर केले असून त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागामध्ये बेघर घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत घरे बांधत असताना हाऊस डिझाइन टायपोलॉजीज आणि अत्याधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करणे, त्यांना सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम बनवणे, बांधकाम खर्च कमी करणे, नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सक्षम करणे, उच्च प्रतीचे व पर्यावरणपूरक बांधकाम करणे याचा प्राधान्याने विचार तर करण्यात आलाच आहे पण त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून घरकुलांचे बांधकाम व्हावे यासाठी डिझाइनही तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा - 'आम्हाला स्वबळावर लढायचे असेल तर कोणाच्या पोटात का दुखावे?'

भारत सरकार यांनी निवडलेल्या राज्यांमध्ये प्रादेशिक आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन घरकुल डिझाइन्स विकसित केले गेले आहेत. या घरकुलाच्या डिझाईन्समध्ये सूर्यप्रकाश, वेंटिलेशन, फिनिशिंगचा प्रकार, इत्यादींचा विचार करून त्यात दारे, खिडक्या इत्यादींचा समावेश असेल. अशा प्रकारे स्थानिक भौगोलिक परिस्थितीला अनुकुल असे घरकुल बांधकामाला मार्गदर्शक ठरावी व त्या धर्तीवर त्या त्या ठिकाणची घरकुले बांधली जावी या उद्देशाने स्थानिक जिओ क्लायमेटीक परिस्थितीचा सारासार विचार करुन प्रत्येक तालुक्यात एक डेमो हाऊस बांधण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे.

येथे क्लिक करा - नांदेडात 700 वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड; 400 वृक्षांना ट्री गार्ड

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डेमो हाऊसची जागा प्राधान्याने पंचायत समिती प्रांगणातच निवडण्यात आली असून नायगाव पंचायत समितीचे शाखा अभियंता गोणेवार यांच्या मार्गदर्शनाखाली डेमो हाऊसचे ( प्रात्यक्षिक घरकुल ) बांधकाम प्रगतीपथावर असून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते लाभार्थ्यांनी भेट देवून पाहणी करावी व त्यानुसार बांधकाम करावे असा उद्देश असल्याचे गोणेवार यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image