esakal | नांदेडात 700 वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड; 400 वृक्षांना ट्री गार्ड
sakal

बोलून बातमी शोधा

घनवन वृक्षारोपन, नांदेड

नांदेडात 700 वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड; 400 वृक्षांना ट्री गार्ड

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरात मनपा व वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून वृक्षलागवड हरीत नांदेड अभियान राबविण्यात येत आहे. रविवार (ता. २०) एक हजार १०० वृक्ष लागवड करण्यात आली. मनपा, वृक्षमित्र फाऊंडेशन, क्रेडाई नांदेड तसेच लॉयन्स क्लब नांदेड प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने रघुनाथनगर तरोडा खु. येथे कॉलनी परिसरात वृक्षमित्र आनंदवन लागवड पद्धतीने 700 वृक्षांची स्थानिक प्रजातींचा वापर करुन लोकसहभागातून लागवड करण्यात आली तसेच 300 मोठ्या वृक्षांची संरक्षित जाळीचा वापर करुन लागवड करण्यात आली. तसेच मालेगाव रोड गजानन मंदिर परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून निसर्गपूरक 100 वृक्षांची संरक्षित जाळीसह लागवड करण्यात आली.

या दोन्ही कार्यक्रमात मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, तहसीलदार किरण अंबेकर, संध्या बालाजीराव कल्याणकर, दीपक राऊत, सुनंदा सुभाष पाटील, ज्योती किशन कल्याणकर, सहाय्यक आयुक्त संजय जाधव आणि मिर्झा फरहतुल्लाह बेग यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. शालोम होम्स, तरोडा (खु) वसाहतचे सुनील श्रीवास्तव, श्री. केंद्रे, शुक्ला व सर्व नगरवासियांनी सहभाग घेतला.

हेही वाचा - सीईओ शिवीगाळ प्रकरणी माजी आमदारांना दिलासा

रघुनाथनगर, तरोडा (खु) संस्थेचे अध्यक्ष नितीन आगळे, सचिव अभिजित रेणापूरकर, हरीश लालवाणी, लायन्स क्लब प्राईडचे अध्यक्ष योगेश मोगडपल्ली तसेच मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक उपस्थित होते.

वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर, प्रीतम भराडीया, सचिन जोड, कैलास अमिलकंठवार, गणेश साखरे, प्रल्हाद घोरबांड, प्रदीप मोरलवार, राज गुंजकर, रुपेश गायकवाड, प्रताप खरात, संजय गौतम, मंगेश महाजन, डॉ चिमणे तुळशीराम, लोभाजी बिराजदार यांनी वरील दोन्ही कार्यक्रमात सहभाग घेतला. वृक्षमित्र फाऊंडेशन शहरातील विविध कॉलनी, मोकळ्या जागा, मुख्य रस्ते, विविध उद्यानात जिथे संगोपनाची हमी असेल तिथे निःस्वार्थ भावनेतून वृक्षलागवड वृक्षमित्र स्वतः खड्डे करुन करीत आहेत.

येथे क्लिक करा - राज्य सरकार, पालिकेच्या भूमिकेमुळे मुंबईतील व्यवसाय डबघाईला आल्याचा व्यापारी संघटनेचा आरोप

मनपा आयुक्त यांनी या प्रसंगी सांगितले की, मागच्या तीन वर्षांपासून वृक्षमित्र फाउंडेशन यांचे हरित नांदेड करण्याचे काम अतुलनीय आहे. या प्रसंगी आयुक्त डॉ. लहाने यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले की जे नागरिक वृक्षरोपणासाठी संरक्षित जाळी किंवा बांबूचे ट्रीगार्ड लोकसहभागातून उपलब्ध करुन देतील त्या भागात मनपा आणि वृक्षमित्र फाऊंडेशनतर्फे वृक्ष उपलब्ध करुन खड्डे खोदून वृक्षारोपण करुन देण्यात येईल.

loading image
go to top