कामगाराने दुकानातच केली आत्महत्या

file photo
file photo
Updated on

नांदेड : दुकानातील वरच्या माळ्यावर साफसफाईसाठी गेलेल्या एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तारासिंह मार्केटमध्ये बुधवारी (ता. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

तारासिंह मार्केटमध्ये काकाश्री नावाचे हार्डवेअर दुकान आहे. या दुकानावर पक्कीचाळ येथील विशाल देवानंद नरवाडे (वय २४) हा कामला होता. तो नेहमीप्रमाणे आजही दुकानावर गेला. मालकाने सांगितल्याप्रमाणे दुकानाच्या वरच्या माळ्यावर तो साफसफाई करण्यासाठी पाठविले. साफसफाई करण्यासाठी तो वर गेला. मात्र बराच वेळ झाल्याने तो खाली आला नसल्याने दुसऱ्या कोमागारास पाहण्यासाठी वर पाठविले. तर तो लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दुकानमालकाने लगेच वजिराबाद पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक संदीप शिवले हे आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी पोहचले. लटकलेल्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. आत्महत्येचे तुर्त तरी कारण समजले नसल्याचे श्री. शिवले यांनी सांगितले. 

फरार तिघांना न्यायालयीन कोठडी

नांदेड : हाणामारी प्रकरणात गुन्हा दाखल होताच मागील सात महिण्यामगाराापासून फरार असलेल्या तिघांना इतवारा पोलिसांनी अटक केली. त्यांना फौजदार डी. एन. काळे यांनी न्यायाधीश एम. बी. कुलकर्णी यांच्या न्यायालयासमरो हजर केले. यावेळी न्यायालयाने या तिन्ही आरोपींना बुधवार (ता. १०) पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. पुन्हा त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

शहराच्या करबला परिसरात ता. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी मोहमद शोएब अब्दुल खलील यांना जुन्या वादातून नऊ जणांनीसंगनमत करून मारहाण केली होती. यात तलवार, दगड व लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी इतवारा पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच मोहमद इफ्तेखार, गुलाम अहमद, विखार अहमद, मोहमद शकील आणि मोहमद जफर यांना अटक केली. त्यांना पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी मिळाली. पोलिसांनी परत अब्दुल अनिस, अब्दुल रईस आणि मोहमद जमीर यांना ता. आठ जून रोजी अटक केली. सोमवारी (ता. नऊ) रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना बुधवार (ता. १०) पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले होते. त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com