esakal | बिहारकडे निघालेल्या मजुरांच्या बसला नांदेडजवळ अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

सोमवारी (ता.१८) सोलापुरहुन बिहारकडे मजुर घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा खेडकरवाडीजवळ (ता. लोहा) रात्री अपघात झाला. यात एकाच जागीच मृत्यू झाला असून सुमारे अठ्ठावीस ते तीस मजुर गंभीर जखमी आहेत. 

बिहारकडे निघालेल्या मजुरांच्या बसला नांदेडजवळ अपघात

sakal_logo
By
एकनाथ तिडके

माळाकोळी (जि.नांदेड) : लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने परप्रांतीय मजुर हतबल झाले आहे. परिणामी मिळेल त्या वाहनाने, पायी प्रवास करत हे प्ररप्रांतीय आपापल्या गावी परतत आहेत. सोमवारी (ता.१८) सोलापुरहुन बिहारकडे मजुर घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा खेडकरवाडीजवळ (ता. लोहा) रात्री अपघात झाला. यात एकाच जागीच मृत्यू झाला असून सुमारे अठ्ठावीस ते तीस मजुर गंभीर जखमी आहेत. 

कोरोना महामारीचा संसर्ग पसरू नये यासाठी शासनाने देश पूर्णतः लॉकडाउन केलेला आहे. त्यामुळे जनजीवनच विस्कळीत होवून गेलेले आहे. उद्योग, व्यवसाय बंद असल्याने लाखो मजुरांच्या हाताला काम राहिलेले नाही. पहिला लॉकडाउन कसाबसा या मजुरांनी काढला.

हेही वाचाच - ‘या’ ठिकाणी प्रशासन पॉझिटिव्ह अन् कोरोना निगेटिव्ह

मात्र, दुसऱ्या लॉकडाउनपासून मदतीचे हात आटल्याने तसेच शासनही मदतीसाठी कमी पडत असल्याने उपासमारीची वेळ या मजुरांवर आलेली आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी अडकलेले परप्रांतीय मजूर आपापल्या परीने आपले राज्य गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांची घरी जाण्याचीही वाट अंधारमय होताना दिसत आहे.

सोमवारी सोलापुरहुन बिहारमधील औरंगाबाद (जि.गया) येथील सुमारे तीसहून अधिक मजूर एका खासगी ट्रॅव्हलसमधून गावी परतत होते. मात्र, रात्रीच्या सुमारास खेडकरवाडीजवळ (ता. लोहा) येथे ही बस येताच पलटी झाली. यामध्ये एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून, इतर अठ्ठावीस ते तीस मजूर गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. हा अपघात एवढा भीषण आहे की, दरीच्या काठावर ही बस पलटी झाली असून, दैव बलवत्तर म्हणून ही बस दरीत कोसळली नाही. 

कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात सध्या लाॅकडाऊन सुरु असुन अन्य राज्यातील मजुरांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. आपापल्या राज्यात परतण्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करुन सध्या मजुर गावी परतत आहेत.  असेच सोलापुर येथे कामानिमीत्त असलेले बिहारमधील औरंगाबाद  येथील मजुर ट्रॅव्हल्सने ( क्र  एम.एच १३,  ए. एक्स ०७७४) ने बिहारकडे जात होते. माळाकोळी जवळील खेडकरवाडी पुलाजवळ आले असता रात्री पावणेअकराच्या सुमारात बसचा अपघात झाला. यात एक मजुर ठार असून, इतर जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालय आणि लोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरु आहेत. 

येथे क्लिक कराच - कोरोना ईफेक्ट; ‘स्वारातीम’चे कामकाज ३१ मेपर्यंत बंद

रात्री उशीरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याने जखमींचा व मृत्युंचा निश्‍चित आकडा कळू शकला नाही. अपघात स्थळाचे चित्र पाहिल्यावर अनेक जण गंभीर जखमी असण्याची शक्यता वाटत असून, घटनास्थळी माळाकोळी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य करत आहे. दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष माऊली गिते व त्यांच्या सहकार्यांनीही जखमींना बाहेर काढुन दवाखाण्यापर्यंत  पोहचवण्यासाठी मदत केली.