वा...रे पठ्ठ्या : पोलिसालाच जीवे मारण्याची धमकी, नांदेडातील घटना

प्रल्हाद कांबळे
Sunday, 23 August 2020

दारु विक्रेत्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिसालाच हुज्जत घातली. एवढेच नाही तर दारुच्या बाटल्या फोडून पुरावा नष्ट केला. आणि शासकिय कामात अडथळा निर्माण करुन जीवे मारण्याची धमकी दिली

नांदेड : काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेल्या दारु विक्रेत्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिसालाच हुज्जत घातली. एवढेच नाही तर दारुच्या बाटल्या फोडून पुरावा नष्ट केला. आणि शासकिय कामात अडथळा निर्माण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शनिवारी (ता. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास उज्वल बजाज शोरुमच्या बाजूला घडला. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेशोत्सवानिमित्त शहरातील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांची धरपकड करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आपल्या यंत्रणेला दिले. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी बालाजी यादगीरवाड हे आपल्या एका सहकाऱ्यांसोबत विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी उज्वल बजाज शोरुम परिसरात सापला लावला. 

हेही वाचानांदेडला लोकप्रतिनिधींनी केली बाप्पाची प्रतिष्ठापना

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले

शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास (एमएच२६-डब्ल्यू- ०४७५) वरुन अविनाश दिपक राठोड (वय ३०) आणि दिपक रुपला राठोड (वय ५०) दोघे राहणार गोविंदनगर हे देशी व विदेशी दारु काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन निघाले. यावेळी सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दुचाकीवरील थैलीमध्ये असलेली विदेशी व देशी पंचासमक्ष फोडून पुरावा नष्ट केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

पोलिसांना जीवे मारण्याची धमकी 

ताब्यात घेताना पोलिसांशी त्यांनी हुज्जत घातली. एवढेच नाही तर धक्काबुक्की करुन पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. परिसरात मोठ्याने ओरडून दहशत पसरविली. दारु विक्री करणारे एवढ्यावर न थांबता त्यांनी पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देऊन शासकिय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसनी त्यांच्याकडून एक मोबाईल व वरील क्रमांकाची दुचाकी जप्त करुन त्यांना विमनतळ पोलिस ठाण्यात हजर केले. 

येथे क्लिक करादोनशे रुग्णांची शनिवारी कोरोनावर मात, नऊ जणांचा मृत्यू; १२२ जण पॉझिटिव्ह

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांच्या आदेशावरुन बालाजी तुळशीराम यादगीरवाड यांनी फिर्याद दिली. त्यावरुन अविनाश राठोड आणि दिपक राठोड यांच्याविरुद्ध शासकिय कामात अडथळा यासह आदी कलमान्वये विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास परिविक्षाधीन फौजदार श्री. रेडेकर करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wow ... Ray : Threats to kill the police, incident in Nanded