Yavatmal Scrub Typhus Case
esakal
माहूर तालुक्यातील पालाईगुडा (भोरड) भागातील महिलेचा स्क्रब टायफसमुळे मृत्यू झाला.
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान २५ तारखेला मृत्यू झाला.
दुसरा रुग्ण अद्याप उपचाराधीन असून जिल्हा आरोग्य विभागाने सतर्कता वाढवली आहे.
माहूर : तालुक्यातील सिंदखेड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पालाईगुडा (भोरड) आणि ग्रामीण रुग्णालय माहूर यांच्या हद्दीत शहरातील मोमीनपुरा भागातील एका महिलेला स्क्रब टायफस (Yavatmal Scrub Typhus Case) हा आजार असल्याचे निदान झाले. शनिवारी (ता.२०) उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा गुरुवारी (ता.२५) मृत्यू झाला.