Rain Alert : वादळी वाऱ्यासह पावसाचा नांदेडला ‘यलो अलर्ट’

नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कमाल तापमानाचा पारा झपाट्याने वाढत आहे.
Rainy-Environment
Rainy-Environmentsakal

नांदेड - जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कमाल तापमानाचा पारा झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या पत्रानुसार नांदेड जिल्ह्यात (ता.सहा व (ता.सात) मे रोजी ‘येलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात या दोन दिवसांच्या काळात एक किंवा दोन ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची तसेच विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. नैसर्गिक आपत्ती संबंधित सर्व यंत्रणा तसेच जनतेने खबरदारी घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्याला हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’ जारी झाल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन स्वतःचे काम करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आपत्तीजनक परिस्थिती वाटल्यास नागरिकांनी काय केले पाहिजे आणि काय टाळले पाहिजे हे सुद्धा प्रशासनाकडून नागरिकांना कळविण्यात आले आहे.

या गोष्टी करा

  • विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

  • आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

  • आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

  • तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

  • पाण्यात उभे असाल तर तत्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करू नका

  • आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका.

  • घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाइपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

  • विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

  • उंच झाडाच्याखाली आसरा घेऊ नका.

  • धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

  • जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com