योगदिनी आमदारांनी पहाटेच केले गुलाबपुष्पांनी स्वागत

नांदेड - योगदिनी आमदारांनी पहाटेच केले गुलाबपुष्पांनी स्वागत
नांदेड - योगदिनी आमदारांनी पहाटेच केले गुलाबपुष्पांनी स्वागत

नांदेड - भल्या पहाटे सर्वांना भेटणारे आमदार म्हणून नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे सर्वपरिचित आहेत. रविवारी (ता. २१) आंतरराष्ट्रीय योग दिन होता. त्यामुळे त्याचे औचित्य साधत आमदार कल्याणकर यांनी योगा करणाऱ्यांचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत केले व योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

भल्या पहाटे स्वागत झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांना आमदारांना पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देण्याची सवय असताना आमदार स्वतः गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत करत होते. त्याचाही अनेकांना आनंद झाला. आमदार स्वतःहून सर्वांना भेटतात. विचारपूस करतात आणि आजचा हा आनंदाचा क्षण अनेक जणांनी कॅमेरामध्ये टिपला. 

आमदारांनी दिल्या अनेक भागांना भेटी
नांदेड शहराच्या तरोडा नाका भागापासून राज कॉर्नर, चैतन्यनगर, सांगवी वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, विद्युतनगर, आनंदनगर, नमस्कार चौक, पीपल्स कॉलेज मैदान अशा भागामध्ये योगासाठी बाहेर पडलेल्या अनेकांना आमदार कल्याणकर यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत अनेक योग ग्रुपला प्रत्यक्ष भेट देत त्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्यामुळे अनेकांनी आमदार कल्याणकर यांचे आभारही मानले. 

उपक्रम घेतल्याबद्दल कौतुक
छान उपक्रम हाती घेतल्याबद्दल कौतुकही केले. आपण स्वतःहून शुभेच्छा दिल्यामुळे सर्वांना आनंद झाला, अशा प्रतिक्रिया पीपल्स कॉलेजच्या मैदानावर उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. अनेक जण योग दिन साजरा करण्यासाठी सर्व नियम पाळून योग करत होते आणि अचानक आमदार कल्याणकर तिथे आले आणि योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सांगवी येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, रमेश कोकाटे यांची उपस्थिती होती. नमस्कार चौक येथे  श्याम बन, मुन्ना राठोड, भारत सरोदे, राहुल सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. 

योग दिवस साजरा केल्याचा आनंद 
या उपक्रमाच्या संकल्पनेबद्दल आमदार कल्याणकर म्हणाले की, मागील वर्षी मोठ्या प्रमाणात योग दिवस जगभर साजरा झाला परंतु या काळात आपण तो करू शकत नव्हतो. मग योगा करणाऱ्या अनेकांचा गुलाबपुष्प देऊन स्वागत केल्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि योग दिवस साजरा केल्याचा आनंद होईल. ही संकल्पना सुचली आणि पहाटे पाच वाजल्यापासून नांदेडच्या अनेक भागांमध्ये जाऊन सर्वांच्या भेटी घेतल्या व त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले. मला माझ्या नांदेडमधील सर्वजण निरोगी असावेत आणि त्यांनी योग, व्यायाम करून आपले शरीर तंदुरुस्त ठेवावे, असे नेहमीच वाटते आणि आज योग दिनाच्या निमित्ताने मला त्यांना शुभेच्छा देता आल्या असल्याचे आमदार कल्याणकर यांनी सांगितले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com