esakal | नांदेडमधील कोरोना योद्धांची व्यथा तुम्ही वाचाच... 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

देशात सध्या कोरोना महामारीने डोके वर काढले आहे. कोरोना योद्धा म्हणून मागील पाच महिण्यापासून जिवाची परवा न करता कोरोना बाधित रुग्णांना सेवा देण्यासाठी सर्वात पुढे असलेल्या डॉक्टरांनाच अत्यावश्यक सेवा सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने निवासी डॉक्टरांमध्ये संतापाची लाट आहे. 

नांदेडमधील कोरोना योद्धांची व्यथा तुम्ही वाचाच... 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे जेवणाबद्दल तक्रार केली होती. कोरोना योद्ध्यांना चांगल्या दर्जाचे जेवण आणि शुद्धा पाणी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु जेवण का मागीतले? याचा मनात राग धरुन अधिष्ठाता यांनी निवासी डॉक्टरांचे चक्क दोन दिवस जेवण आणि पाण्याचे पाणी बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

हा गंभीर प्रकार जिल्ह्यातील नावाजलेल्या आणि सर्वात मोठ्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात घडला आहे. शुक्रवारी (ता.सात) अचानक कोविड सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांचे जेवण बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे पिण्याचे पाणी देखील बंद करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेच्या (मार्ड) पदाधिकाऱ्यांनी दिली.  

हेही वाचा- शेतकऱ्याचं पोर कमावतो महिण्याला लाखो रुपये, कसे? ते वाचाच ​

अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे विद्यार्थ्यांना आश्वासन
 
घडलेला प्रकार गंभीर असल्याने व कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवल्याने सर्व डॉक्टरनी मिळून अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. इतकेच नव्हे तर काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर निवासी डॉक्टरना चांगले जेवण, शुद्ध आणि पाणी व विद्यावेतन या सारख्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आश्वासन दिले. 

हेही वाचा- नांदेड : व्यवसायिकांनो कोरोना टेस्ट करा अन्यथा दुकाने बंद, आयुक्तांनी काढले आदेश ​

कोरोना योद्धांचे आरोग्य धोक्यात 

पंजाब भवन कोविड सेंटरनंतर शासकीय रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९१ इतकी आहे. यासाठी डॉक्टरांना तीन सिफ्टमध्ये काम करवे लागत आहे. एका सिफ्टमध्ये ११ डॉक्टर काम करत आहेत. असे एकुण ३३ डॉक्टर रोज कर्तव्यावर असतात. त्यांना धड राहण्याची व्यवस्था नाही की, जेवण, पाणी वेळेवर मिळत नाही. पिण्याच्या पाण्याचा ॲरो नेमका कोरोना बाधित रुग्णांच्या वॉर्डातील स्वच्छताग्रहाशेजारी बसविण्यात आला आहे. यामुळे कोरोना योद्धांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डॉक्टरांना राहण्यासाठी स्वतंत्र सुविधा नसल्यामुळे आत्तापर्यंत १५ योद्धांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील पाच डॉक्टरांनी कोरोनावर मात केली असली तरी, अजून १० डॉक्टरांवर उपचार सुरु आहेत. कोरोना योद्धांनाच लागण होत असल्याने पाहुन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नुकतीच कोरोना योद्धांची पांगरी येथील दंत महाविद्यालयात राहण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.  

 

loading image
go to top