Loha News : मराठा आरक्षणावर तोडगा निघत नसल्यामुळे तरुणाने घेतला गळफास

मराठा आरक्षणावर अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे तरुणाने आरक्षणाच्या बाबतीत 'हे सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही...' अशी चिठ्ठी लिहून आपले जीवन संपवले.
Damodar Kale

Damodar Kale

sakal

Updated on

लोहा, (जिल्हा नांदेड) - मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मनोज रांगे हे अंतरवलीत उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणावर अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे वडगाव (तालुका लोहा) येथील तरुणांने आरक्षणाच्या बाबतीत 'हे सरकार मराठ्यांना आरक्षण देत नाही...' अशी चिठ्ठी लिहून आपले जीवन संपवले आहे. ही घटना सोमवारी (ता. ३१) सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com