Nanded News: दोन दुचाकींच्या धडकेमध्ये युवक ठार, वडील बचावले
Nanded Accident: लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ दोन दुचाकींचा जोरदार अपघात झाला. यामध्ये युवक ठार झाला, तर वडील व आणखी दोन जखमी झाले. सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मृतकाचा पुढील उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लोहा : दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार, तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील समर्थ टी हाऊसजवळ गुरुवारी (ता. नऊ) रात्री साडेआठच्या दरम्यान घडला.