अहो आश्चर्यम! कोरोनाने मृत्यू पावलेला तरूण निघाला जिवंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A young man who was killed by a corona at Borgaon has come alive.jpg

सदर माहिती निवघा पोलिस चौकीचे फौजदार भारत सावंत यांनी बोरगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांना देण्यात आली.

अहो आश्चर्यम! कोरोनाने मृत्यू पावलेला तरूण निघाला जिवंत

निवघा बाजार ( नांदेड) : येथून जवळच असलेल्या मौजे बोरगाव (ह) ता. हदगाव येथील तरुण यवतमाळ येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेताना मृत्यू झाल्याची माहिती हदगाव पोलिस स्टेशनला कळविण्यात आल्याने बोरगाव येथील सदर तरूणाच्या नातेवाईकांना निरोप देण्यात आला. परंतु सदर तरूण जिवंत असल्याने सदर तरूणाच्या नातेवाईकांना मोठा मानसिक त्रास झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हदगाव तालुक्यातील बोरगाव ( ह. ) येथील सुरेश रामदास बोंढारे हा तरुण पत्नीची पोटगी न भरल्याने यवतमाळ येथील कारागृहात १५ दिवसापूर्वीच दाखल झाला होता. परंतु त्याला कोरोना झाल्याने यवतमाळ येथील कोविड सेंटरला उपचार घेत होता. परंतु पोलिस अधिक्षक कार्यालय यवतमाळ यांनी पोलिस अधिक्षक कार्यालय नांदेडला बोरगाव येथील सुरेश रामदास बोंढारे हा कोरोनामुळे मरण पावला आहे, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांना कळविण्याचे सांगितले. तशी माहीती कंट्रोल रूम कडून हदगाव ठाण्यात मिळाली व तशी नोंद हदगाव ठाण्यात करण्यात आली. 

काँग्रेसचे बाबुराव कोंढेकर यांचा अर्धापूर सेवा सहकारी सोसायटीच्या मतदार संघातून एकतर्फी विजय

सदर माहिती निवघा पोलिस चौकीचे फौजदार भारत सावंत यांनी बोरगाव येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांना देण्यात आली. तरूण मयत झाल्याची वार्ता गावात वाऱ्या सारखी पसरली. सुरेश बोंढारे यांचे नातेवाईक यवतमाळ येथे गेले असता त्याना सदर तरूण जिवंत पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सदर तरुण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून तो ठणठणीत असल्याचे त्याच्या नातेवाईकाने सांगितले. पोलिस प्रशासनाच्या चुकीमुळे आम्हाला खूप मानसिक त्रास झाल्याचे विनायकराव कदम यांनी सांगितले. याबाबत पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग किती तत्पर आहे, हे लक्षात येते? वरिष्ठांकडून जशी माहिती मिळाली तशी आम्ही दिली. त्यात आमची काय चूक असे फौजदार भारत सावंत म्हणाले. 

Web Title: Young Man Who Was Killed Corona Borgaon Has Come Alive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..