गोरगरिबांच्या मदतीला धावले ख्रिश्चन समाजातील युवक 

शिवचरण वावळे
Wednesday, 12 August 2020

नांदड - कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन झाला होता. त्यामुळे तळहातावर पोट असणारे किंवा भंगार वेचुन उपजिविका भागवणारे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. आजही त्यांना वेळेवर जेवण मिळत नाही. अशा रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या गोरगरीब लोकांची परवड होत आहे. लॉकडाउनमुळे जेवणाचे हाल होत असलेल्या अश्या कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांना घरपोच जेवण देण्याचे काम ख्रिश्चन युवा ग्रुपच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी जेसिका शिंदे यांनी पुढाकार घेतला असून मागील चार महिन्यापासून हे काम अविरतपणे सुरु आहे. 

नांदड - कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन झाला होता. त्यामुळे तळहातावर पोट असणारे किंवा भंगार वेचुन उपजिविका भागवणारे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. आजही त्यांना वेळेवर जेवण मिळत नाही. अशा रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या गोरगरीब लोकांची परवड होत आहे. लॉकडाउनमुळे जेवणाचे हाल होत असलेल्या अश्या कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांना घरपोच जेवण देण्याचे काम ख्रिश्चन युवा ग्रुपच्या माध्यमातून होत आहे. त्यासाठी जेसिका शिंदे यांनी पुढाकार घेतला असून मागील चार महिन्यापासून हे काम अविरतपणे सुरु आहे. 

जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा झाली अन सुरुवातीच्या काळात भुकेल्या परिवारांच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था, संघटना, व्यापारी, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रशासनाच्या माध्यमातून एका कुटुंबास पुरेल इतके पाच किलो गहु, तांदूळ यासह डाळी, मीठ, तिखट अशा अत्यावशक साहित्याची किट तयार करुन ती गरजवंतापर्यंत पोहचती केल्याने उपाशीपोटी झोपणाऱ्या कुटुंबियांना चांगला दिलासा मिळाला होता. दुसरीकडे लॉकडाउनच्या काळात देखील स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून अनेकांना शिधापत्रिका नसताना देखील रेशन दिले जात होते. त्यामुळे अनेकांच्या हाताला कामे नसले तरी, दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. 

हेही वाचा - देशभरातील १५ संशोधकांच्या यादीत नांदेडच्या शिवराज नाईकची निवड; या आजारावर केले महत्वपूर्ण संशोधन ​

भुकेल्यांसाठी जेवणाची केली सोय 

शासनस्तरावर रेशन दिले जात आहे. लॉकडाउनमध्ये शिथील झाले असले तरी अनेकांच्या हाताला कामे नसल्याने व कुणी कामावर घेत नसल्याने अनेकांचे हाल सुरु आहेत. त्यामुळे आजही बरीच कुटुंबियाची चूल पेटत नसल्याने त्यांना उपाशीपोटी रहावे लागत असल्याचे लक्षात आल्याने व इतर संस्था, संघटनांची मदत करुन झाल्यानंतर भुकेल्या कुटुंबियांसाठी जेवणाची सोय करता येईल का? या उद्देशाने जेसिका शिंदे, सॅम कांबळे, क्लेमेंट अल्लडा व टी. जयंत यांच्यासह काही युवा मंडळीनी एकत्र येत ‘ख्रिश्चन युवा ग्रुप’च्या माध्यमातून दानशुरांना मदतीसाठी आवाहन केले. 

हेही वाचलेच पाहिजे -  नांदेडमधील कोरोना योद्धांची व्यथा तुम्ही वाचाच...

युवकांनी घेतला पुढाकार 

‘ख्रिश्चन युवा ग्रुप’च्या माध्यमातून केलेल्या या आवाहनास समाजातून चांगला प्रतिसाद मिळात गेला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक, रेल्वे स्थानकावर अडकून पडलेले प्रवाशी, भंगार वेचणारे कुटुंब, रस्त्याच्या कडेला उपाशी राहणाऱ्या कुटुंबांचा व व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या गरजेनुसार शेकडो जणांना जेवणाचे डबे दिले जात होते. आजही त्यात खंड पडलेला नाही. त्यांनी या उपक्रमाची कुठेही वाच्यता न करता काम सुरु ठेवले आहे. त्यांच्या या कार्याची पोलीस विभागातील काही कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांना माहिती झाली. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या अनेक पोलीस कर्मचारी यांच्याकडून देखील त्यांना उपाशीपोटी कुटुबियांची माहिती मिळत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young People From The Christian Community Rushed To The Aid Of The Poor Nanded News