esakal | गावी निघालेल्या तरुणाचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

0accident_29_0.jpg

गावी निघालेल्या तरुणाचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हणेगाव (जि.नांदेड) : मालवाहतूक ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या एका २२ वर्षीय युवकाचा जागीच (Accident In Nanded) मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२९) सकाळी हणेगाव बसस्थानकाजवळ घडली. तालुक्यातील सावळी बेंनाळ येथील तुकाराम येंगाळे (वय २२) हा युवक बिदरहून (Bidar) आपल्या गावी सावळी बेनाळकडे जात होता. मात्र, मालवाहतूक ट्रकच्या (एमएच - २६ एडी ३९३५) चालकाने हणेगाव बसस्थानक ठिकाणी महामार्गावर अचानकपणे ब्रेक लावला. त्यामुळे पाठीमागून आलेला दुचाकी चालक तुकाराम हणमंत येंगाळे याने भरधाव वेगात येऊन ट्रकला धडक दिली. त्याचा डोक्याला व कपाळाला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.(youth died in two wheeler truck accident in nanded district glp88)

हेही वाचा: औरंगाबादच्या स्मार्ट सिटी बसची देशपातळीवर दखल

घटनेची माहिती मिळताच मरखेल ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर, जमादार कणकवळे व पोलिस सहकारी यांनी सदरील युवकास प्राथमिक आरोग्य केंद्र हणेगाव येथे नेले. वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. याबाबत नातेवाईक विठ्ठल ज्ञानोबा येंगाळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकच्या चालकास ताब्यात घेतले असून घटनेचा तपास फौजदार अजित बिरादार करत आहेत.

loading image
go to top