esakal | नागपुरात धान्याच्या गोदामाला भीषण आग
sakal

बोलून बातमी शोधा

नागपुरात धान्याच्या गोदामाला भीषण आग

बंगाली पंजा परिसरातील सुनील धोटकर यांच्या मालकीच्या धाग्याच्या गोदामाला आज (रविवार) भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले.

नागपुरात धान्याच्या गोदामाला भीषण आग

sakal_logo
By
प्रतीक बारसागडे

नागपूर : बंगाली पंजा परिसरातील सुनील धोटकर यांच्या मालकीच्या धाग्याच्या गोदामाला आज (रविवार) भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले.

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या गोदामाजळील सहा घरांनाही आगीच्या झळा बसल्या. एका इमारतीत वेगवेगळ्या दोन माळ्यांवर अडकलेल्या तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीवर दुपारनंतर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलातील जवानांना यश आले.

loading image
go to top