esakal | गोष्टीवेल्हाळ ‘मिसेस फनीबोन्स’
sakal

बोलून बातमी शोधा

Twinkle-Khanna

अतिशय ग्लॅमरस कुटुंबाशी संबंधित आणि स्वतःही एकेकाळी या ग्लॅमरनं न्हाऊन निघालेली अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता मात्र वेगळ्याच वाटेवर आहे. तिला सापडलेली वाट आहे ती लेखनाची. प्रासंगिक स्तंभलेखनातून ती पुस्तकांकडे वळली आणि आता ट्विंकल चक्क बेस्टसेलर्स पुस्तकांची लेखक आहे. ‘मिसेस फनीबोन्स’, ‘द लिजंड ऑफ लक्ष्मीप्रसाद’ अशा पुस्तकांद्वारे तिनं वेगळी ओळख तयार केली आहे.

गोष्टीवेल्हाळ ‘मिसेस फनीबोन्स’

sakal_logo
By
ट्विंकल खन्ना

अतिशय ग्लॅमरस कुटुंबाशी संबंधित आणि स्वतःही एकेकाळी या ग्लॅमरनं न्हाऊन निघालेली अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता मात्र वेगळ्याच वाटेवर आहे. तिला सापडलेली वाट आहे ती लेखनाची. प्रासंगिक स्तंभलेखनातून ती पुस्तकांकडे वळली आणि आता ट्विंकल चक्क बेस्टसेलर्स पुस्तकांची लेखक आहे. ‘मिसेस फनीबोन्स’, ‘द लिजंड ऑफ लक्ष्मीप्रसाद’ अशा पुस्तकांद्वारे तिनं वेगळी ओळख तयार केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुणाला कधी कोणती वाट सापडेल, हे सांगता येत नाही. अतिशय ग्लॅमरस कुटुंबाशी संबंधित आणि स्वतःही एके काळी या ग्लॅमरनं न्हाऊन निघालेली अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता मात्र वेगळ्याच वाटेवर आहे. तिला सापडलेली वाट आहे लेखनाची. सुरुवातीला स्तंभलेखन करताकरता ट्विंकल गोष्टीही लिहायला लागली. या प्रासंगिक लेखनाची पुस्तकं निघायला लागली आणि आता ट्विंकल चक्क बेस्टसेलर्स पुस्तकांची लेखक आहे. तिची खास निरीक्षणं, विनोदाची मस्त फोडणी आणि उपरोधाची सुरेख झालर, यांतून तिच्या लेखनाचा एक वेगळाच मसाला तयार झाला आहे. अगदी अवचितपणे सापडलेली ही लेखनवाट हाच ट्विंकलचा ‘यूएसपी’ बनला आहे. ‘मिसेस फनीबोन्स’ या पुस्तकाबरोबर तिची ओळख इतकी घट्ट झाली, की तिनं नंतर स्वतःचं प्रॉडक्शन हाउस काढलं, तेव्हाही त्याचं नाव ‘मिसेस फनीबोन्स मूव्हीज’ असंच ठेवलं आहे. 

‘फनीबोन्स’नंतर ट्विंकलनं ‘द लिजंड ऑफ लक्ष्मीप्रसाद’ हे पुस्तक लिहिलं. ‘द लिजंड’चं वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त पुस्तकापुरतं मर्यादित राहिलं नाही. या पुस्तकात ट्विंकलनं छोट्या कथा लिहिल्या आहेत. त्यातली एक कथा अरुणाचलम मुरुगनाथम यांच्यावर आधारित होती. अक्षयकुमारनं पुढाकार घेऊन याच मुरुगनाथम यांच्यावर नंतर ‘पॅडमॅन’ हा चित्रपट तयार केला आणि हा चित्रपट खूप गाजला. ट्विंकलचं ‘पैजामाज आर फर्गिव्हिंग’ हे ताजं पुस्तकही खूप गाजतंय. ट्विंकलच्या या तीनही पुस्तकांनी विक्रीचा जोरदार विक्रम केला आहे. ‘मिसेस फनीबोन्स’ या तिच्या पहिल्याच पुस्तकाला इतका प्रतिसाद मिळाला, की २०१५ या वर्षामध्ये ती देशातली पुस्तकांची सर्वाधिक विक्री होणारी लेखिका होती. 

लेखनाचं बीज तिच्यात नव्हतं, असंही नाही. गंमत म्हणजे साधारण विशीमध्ये असतानाच ट्विंकल एक कादंबरी लिहीत होती. नंतर तिला कंटाळा आला आणि तिनं ते काम सोडून दिलं. ‘मिसेस फनीबोन्स’नंतर तिला पुन्हा ती कादंबरी आठवली. तिनं मग तीच कादंबरी नव्या अनुभवांच्या मदतीनं, नव्या दृष्टिकोनातून लिहिली आणि ‘द लिजंड ऑफ लक्ष्मीप्रसाद’चा तिथं जन्म झाला. ट्विंकलकडे स्तंभलेखनही योगायोगानं आलं आणि एका टप्प्यावर तर ती तीन ते चार ठिकाणी स्तंभ लिहीत होती. नंतर हळूहळू पुस्तकांचा प्रवास सुरू झाला. आता ट्विंकल केवळ एक लेखिका नव्हे, तर बेस्टसेलर पुस्तकांची लेखिका बनली आहे. तिची ही लेखनवाट अनेकांना प्रेरणा देणारी आहे, यात शंकाच नाही.   

मी रोज काहीतरी लिहितेच. काही वेळा तर मी दिवसातले दहा-बारा तास लिहीत असते. हे कुणी सांगितलं आहे म्हणून मी करत नाही, तर त्या वेळी मी त्या जगात पूर्ण बुडालेली असते. त्या क्षणापुरतं ते आभासी जग, हेच माझं खरं जग बनलेलं असतं. 
- ट्विंकल खन्ना

Edited By - Prashant Patil

loading image
go to top