Navratri Festival 2019 : ‘सकाळ’ वाचा, बक्षिसे जिंका

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

नवरात्रोत्सवानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने मंगळवारी (ता. १) ‘उदे गं अंबे उदे’ पुरवणी प्रकाशित केली. त्यातील प्रश्‍नमंजूषा सोडवून भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी वाचक व देवीभक्तांना मिळाली आहे. त्यासाठीची उत्तरपत्रिका मंगळवारच्याच ‘पिंपरी-चिंचवड टुडे’मध्ये प्रकाशित केली आहे. ती भरून शुक्रवारी (ता. ४) दुपारी चारपर्यंत जवळच्या संकलन केंद्रांवर किंवा ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात जमा कराव्यात.

पिंपरी - नवरात्रोत्सवानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने मंगळवारी (ता. १) ‘उदे गं अंबे उदे’ पुरवणी प्रकाशित केली. त्यातील प्रश्‍नमंजूषा सोडवून भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी वाचक व देवीभक्तांना मिळाली आहे. त्यासाठीची उत्तरपत्रिका मंगळवारच्याच ‘पिंपरी-चिंचवड टुडे’मध्ये प्रकाशित केली आहे. ती भरून शुक्रवारी (ता. ४) दुपारी चारपर्यंत जवळच्या 
संकलन केंद्रांवर किंवा ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात जमा कराव्यात. 

नवरात्रोत्सव म्हणजे आदिमाया, आदिशक्ती देवीचा उत्सव. देशभर देवींची शक्तिपीठे आहेत. राज्यात साडेतीन शक्तिपीठे आहेत. त्यांची माहिती सर्वांना व्हावी, या हेतूने ‘उदे गं अंबे उदे’ ही अर्धदैनिक आकारातील पुरवणी प्रसिद्ध केली. त्यातील प्रश्‍नमंजूषा सोडवून उत्तरे उत्तरपत्रिकेत नमूद करायची आहेत. त्यावरील रकान्यात आपले नाव व इतर माहिती लिहायची आहे. उत्तरपत्रिका भरून आपापल्या परिसरातील जवळच्या संकलन केंद्रांवर किंवा ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात (बी झोन, पाचवा मजला, जुना पुणे-मुंबई महामार्ग, पिंपरी) शुक्रवारी दुपारी चारपर्यंत जमा करायच्या आहेत. संकलन केंद्रांची ठिकाणे उत्तरपत्रिकेत दिली आहेत. अचूक उत्तरे देणाऱ्या भक्तांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.

स्पर्धेचा निकाल शनिवारी (ता. ५) ‘ड्रॉ’ पद्धतीने काढण्यात येणार आहे. रविवारच्या (ता. ६) अंकात निकाल प्रसिद्ध होईल. त्याच दिवशी दुपारी अडीच वाजता बक्षीस वितरण होईल. तर मग सज्ज व्हा, पुरवणी वाचून प्रश्‍नमंजूषा सोडवा आणि जिंका भरघोस बक्षिसे.

अधिक माहितीसाठी संपर्क - ९५४५९५४७३३.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri festival 2019 Sakal Ude g Ambe Ude Suppliment Quiz Contest Gift