Navratri Festival 2019 : चौथ्या माळेला गुलाबी शालूने नटली देवी सप्तश्रृंगी

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 October 2019

आज (ता.२) चौथ्या माळेस देवी सप्तश्रृंगीला गुलाबी रंगाचा शालू नेसवून चांदीचा मुकुट, गुलाब हार, मयुर हार, मनी मंगळसुत्र, कमरपट्टा, तोटे, नथ, कर्णफुले, पाऊल आदी आभुषणे चढवून साजशृंगार करण्यात आला. यानंतर पंचामृत महापुजा आरती संपन्न झाली.

वणी : 'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते', मंत्रघोष व 'अंबे माता की जय','सप्तश्रृंगी माते की जय' चा जयघोषातात मोठ्या आनंदमय व भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेस वणी गडावर भाविकांची गर्दी उसळली आहे. 

गुलाबी रंगाचा शालू व आभूषणांनी नटली देवी..

देवीच्या पंचामृत महापूजेस आज सकाळी ७ वाजता मुंबई येथील विधीतज्ञ  सुरेश पाकळे व जिल्हा परीषद सदस्य नितीन पवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांच्या उपस्थित सुरुवात झाली. देवीची  पंचामृत महापूजा झाल्यानंतर गुलाबी रंगाचा शालू नेसवून चांदीचा मुकुट, गुलाब हार, मयुर हार, मनी मंगळसुत्र, कमरपट्टा, तोटे, नथ, कर्णफुले, पाऊल आदी आभुषणे चढवून साजशृंगार करण्यात आला. यानंतर पंचामृत महापुजा आरती संपन्न झाली. यावेळी न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, उपसरपंच राजेश गवळी, संदीप बेनके, मंदीर प्रमुख प्रशांत निकम, किरणसिंग राजपूत, प्रकाश पगार समस्त पुरोहीत व भाविक उपस्थित होते. आज गांधी जयंती निमित्त सुट्टी असल्यामूळे भाविकांची सकाळ पासून गडावर भाविकांची गर्दी उसळली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: goddess saptshringi worn pink saree on fourth day