रविवारपासून होणार आदिमायेचा जागर!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 September 2019

उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास रविवार (ता. २९) पासून सुरुवात होत आहे. नवरात्र काळात  विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे प्रतिवर्षाप्रमाणे सप्तशृंगी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव यात्रा (ता. २९) सप्टेंबर अर्थात अश्विन शुद्ध प्रथम ते महानवमी (ता.८)ऑक्टोंबर अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमी या दरम्यान चालणार आहे. 

वणी : उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठअसलेल्या सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास रविवार (ता. २९) पासून सुरुवात होत आहे. नवरात्र काळात  विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे प्रतिवर्षाप्रमाणे सप्तशृंगी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव यात्रा (ता. २९) सप्टेंबर अर्थात अश्विन शुद्ध प्रथम ते (ता.८)ऑक्टोंबर महानवमी अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमी या दरम्यान चालणार आहे. 

असे असतील नवरात्रोत्सवाचे कार्यक्रम..
 कावड यात्रा अर्थात कोजागिरी पौर्णिमा उत्सव १२ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबरपर्यंत होत आहे. या कालावधीत श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने तसेच विविध धार्मिक संस्थांतर्फे कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. याच कालावधीत विविध सेवाभावी संस्थातर्फे गडावर व गडाकडे येणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी भाविकांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. रविवारी सकाळी ७ वाजता भगवतीची पंचामृत महापूजा संपन्न होणार असून सकाळी ९.३० वाजता घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ होईल.

ध्वजपुजनाच्या प्रथेला महत्व

नवरात्रोत्सव काळात दररोज सकाळी ७ वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा संपन्न होईल. नवरात्रोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या सोमवार, (ता. ७) ऑक्टोंबर आश्विन शुध्द महानवमीच्या दिवशी सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा, दुपारी ४ वाजता न्यासाच्या कार्यालयात ध्वजाचे पुजन झाल्यानंतर ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबीयाकडे ध्वज सुपूर्द केला जाईल व त्यानंतर ध्वजाची सवाद्य मिरवणूक संपन्न होईल. तसेच सायंकाळी पाच वाजता सभामंडपात शतचंडी योग, होम हवन पूजा संपन्न होणार आहे. याच दिवशी रात्री १२ वाजता शिखरावर किर्तीध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील ध्वजारोहण करतील.

ठिकठिकाणाहून कावडधारकांची हजेरी

मंगळवार, (ता.८) ऑक्टोंबर अर्थात विजयादशमीला सकाळी दहा वाजता शतचंडी याग व पूर्णाहूती संपन्न होईल व त्यानंतर गडावर दसरा साजरा करण्यात येईल. तसेच ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीत पंरपरेनुसार बळी देण्यात येईल. शनिवार, ता.१२ रोजी कोजागिरी पौर्णिमा उत्सावास प्रारंभ होईल. या दिवशी सकाळी ७ वा. पंचामृत महापूजा संपन्न होईल. रविवार (ता. १३) ऑक्टोंबरला सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा व दुपारी साडेबारा ते रात्री ८ वाजपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून ठिकठिकाणावरुन कावडीधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदीरात स्वीकारले जाईल. व यानंतर भगवतीचा रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत जलाभिषेक पंचामृत महापूजा संपन्न होणार आहे. व सोमवार, (ता. १४) ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे सात वाजता शांतीपाठ संपन्न होवून महाप्रसादाच्या वाटपाने नवरात्रोत्सव व कोजागिरी उत्सवाची सांगता होणार आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navratri festival starting from sunday at saptashringi