Navratri festival 2019 : हिरवा शालू व साजशृंगाराने नटली माता सप्तश्रृंगी!...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

उत्तर महाराष्ट्राची कुलदैवता आदिमाता सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवातील आजच्या तिसऱ्या माळेस हिरव्यागार निसर्ग सौदर्याने नटलेल्या वणीच्या गडावर आई भगवती हिरवा शालू व साजशृंगाराने नटलेली होती. 

 

वणी ( नाशिक) :  उत्तर महाराष्ट्राची कुलदैवता आदिमाय सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवातील आजच्या तीसऱ्या माळेस हिरव्यागार निसर्ग सौदर्याने नटलेल्या सप्तशृंगी गडावर आई भगवती हिरवा शालू व साजशृंगाराने नटलेली होती. 

आई भगवतीची पंचामृत महापूजा नाशिक विभागीय उपायुक्त दिलीप गांधी व अजय निकम यांनी आज आपल्या कुटुंबीयासमवेत केली. यावेळी न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, प्रशासकीय कार्यलयीन प्रमुख प्रकाश पगार, उपसरपंच राजेश गवळी, शांताराम सदगीर आदींसह उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: third day of navratri while goddess saptashringi worn green