ब्यूटी विथ ‘योगा’! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 October 2020

मोठ्या पडद्यावरील महत्त्व कमी होत गेल्यावर तिनं छोटा पडदा जवळ केला आणि ‘नच बलिये’ किंवा ‘सुपर डान्सर’सारख्या रिॲलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत धमाल करीत घराघरांत पोचली.

शिल्पा शेट्टीला आपण अभिनेत्री म्हणून गेली २३ वर्षे ओळखतो आहोत, मात्र केवळ अभिनयात गुंतून न पडता तिनं अनेक क्षेत्रात लिलया मुशाफिरी करीत आपलं नाव कायमच चर्चेत ठेवलं आहे. आयपीएल क्रिकेटमुळं निर्माण झालेले वादंग असो वा इंग्लंडमध्ये जाऊन जिंकलेला ‘बिग ब्रदर’चा शो, तिच्या नावाची चर्चा अनिवार्यच असते. योगासनांच्या माध्यमातून लोकांना फिटनेसचे धडे देत तिनं स्वतःचाही फिटनेस जपला असून, मोठ्या कारकिर्दीनंतरही तिचा ‘फ्रेश’ वावर तिच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नायक-नायिकांना चिरतारुण्याचं वरदान मिळालं आहे. यामध्ये नायकांची संख्या मोठी असली, तरी काही नायिकांनीही आपला ठसा उमटवला आहे. त्यात आघाडीचं नाव आहे शिल्पा शेट्टीचं. ‘बाजीगर’मध्ये शाहरुख खानची नायिका म्हणून तिनं झोकात पदार्पण केलं. चित्रपटातील सीमा चोप्रा या भूमिकेसाठी फिल्मफेअरचा ‘न्यू फेस’ पुरस्कार मिळवत तिनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं व आजही हा ‘फेस’ तेवढाच फ्रेश आहे! तिनं अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या, मात्र ‘धडकन’ किंवा ‘लाइफ इन अ मेट्रो’सारख्या चित्रपटांतील भूमिकांचं विशेष कौतुक झालं. ती केवळ चित्रपट एके चित्रपट न करता विविध क्षेत्रांत नशीब अजमावत राहिली व त्यामुळंच चर्चेतही राहिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोठ्या पडद्यावरील महत्त्व कमी होत गेल्यावर तिनं छोटा पडदा जवळ केला आणि ‘नच बलिये’ किंवा ‘सुपर डान्सर’सारख्या रिॲलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत धमाल करीत घराघरांत पोचली. कधी राणी एलिझाबेथला भेटीच्या निमंत्रणामुळं, तर कधी रिचर्ड गेर या हॉलिवूडच्या अभिनेत्याबरोबरच्या चुंबनाच्या प्रसंगामुळं तिला ‘फुटेज’ मिळालं. ‘बिग ब्रदर’मध्ये तिच्यावर वर्णद्वेषी टोमणे मारले गेले, मात्र तिनं ही स्पर्धा जिंकत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. ‘सोल करी’ नावचं कुक बुक असो वा ‘हनुमान’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात सीतेची भूमिका, शिल्पाचं नवा चर्चेत होतंच. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोस्टर गर्ल ऑफ फिटनेस! 
या सर्व काळात तिचा फिटनेस हा कायमच चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरला. राज कुंद्रा यांच्याशी लग्न व त्यानंतर पहिलं मूल झाल्यानंतरही तिचा फिटनेस अधिकच वाढत गेला! ‘बाजीगर’मध्ये टॉम गर्ल दिसणारी शिल्पा ‘झिरो फिगर’ मेंटेन करीत ताज्या दमाच्या अभिनेत्रींनाही टक्कर देत राहिली. याचं महत्त्वाचं कारण ठरलं तिनं योगासनांना दिलेलं महत्त्व. ‘पोस्टर गर्ल ऑफ फिटनेस’ अशी उपाधी मिळालेल्या शिल्पानं २०१५मध्ये योगासनांची डीव्हीडी बाजारात आणली, तर मागील वर्षी वेलनेसच्या ॲपद्वारे लोकांना फिटनेसची धडे देऊ लागली. ‘द शिल्पा शेट्टी ॲप’मध्ये ती दररोज करण्याची योगासने, फंक्शनल ट्रेनिंग, महिलांसाठी गरोदरपणात करायची व मासिक पाळीमध्ये येणारे क्रॅम्प टाळण्यासाठीची योगासने ती या ॲपद्वारे शिकवते. घरातल्या घरात व कोणतेही उपकरण न वापरता करायची ही योगासने महिलांमध्ये लोकप्रिय ठरली. रामदेवबाबांपासून पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांनीच तिच्या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. 
आपलं नाव व चेहरा कायमच चर्चेत ठेवणाऱ्या देशातील आघाडीच्या नावांपैकी असलेल्या शिल्पाचा प्रवास योगासनांमुळं अधिक सुकर झाला आहे, हे नक्की. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about beauty with yoga