esakal | परफेक्ट मेकअप करण्यासाठी जाणून घ्या 'या' 5 महत्वाच्या टिप्स :Makeup Tips
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Fashion News Get ready for the office with makeup instantly! Learn simple tips

परफेक्ट Makeup करण्यासाठी जाणून घ्या 'या' 5 महत्वाच्या टिप्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारतात नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात तर भजन, किर्तन, पूजा-पाठ केले जातात. नऊ दिवस नऊ रंगांची जणू मुक्त उधळणच केली जाते. या नवरात्रीचा नऊवा दिवस म्हणजे दसरा. यादिवशी सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. आठ दिवस उपवास करून दसऱ्या दिवशी याची समाप्ती होते. यादिवशी उपवास करणाऱ्या बऱ्याच महिला नविन कपडे परीधान करतात. अशावेळी हटके लुक असावा अशी अनेकांची इच्छा असते. बऱ्याचदा चांगली कपडे परीधान केल्यानंतर मेकअप ही तश्याच पध्दतीने असावा लागतो. यासाठी काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. एक म्हणजे त्वचेची काळजी करत असताना क्लिजिंग, टोनिंग आणि मॉइश्चराइज़िंग चा वापर करा. याचबरोबर हेल्दी डायट करा. पाण्याचा वापर मुबलक करा.

कोणताही ड्रेस परीधान केल्यानंतर त्यावेळी हलकासा मेकअप हा हवाच. मेकअप करताना सर्रास फाउंडेशन हे लावले जाते. मात्र हे जर व्यवस्थित लावले नाही तर चेहऱ्यावर पांढरे डाग पडतात. यासाठी नेहमी फाउंडेशन लावण्यापुर्वी प्रायमर आॅईल लावा. त्याचबरोबर मेकअप चांगला टिकून राहावा यासाठी मेकअप करण्याआधि चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. या दसऱ्याला नविन ड्रेस सोबत मेकअप करायचा आहे. तर या ५ टिप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

डोळ्यांवर करा फोकस

डोळ्याला काजळ लावून घ्या. मस्कराच्या मदतीने पापण्यांना जाडसर आणि आई मेकअपने डोळ्यांना हायलाईट करा. काजळ पसरू नये म्हणून काळ्या रंगाची आई-शॅडोच्या मदतीने सेट करा.

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी

चेहरा चमकवण्यासाठी चेहऱ्यावर हाइलायटरचा वापर करा. फाऊंडेशन लावण्यापुर्वी हाइलायटर लावा. यामुळे हाइलायटर जादा नैसर्गिक वाटेल आणि चेहरा ग्लो होईल.

आयब्रोजला शेप द्या

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम आयब्रोज करत असतात. म्हणून कोणताही मेकअप करण्यापूर्वी आयब्रो सेट करून घ्या. त्याचबरोबर मेकअप झाल्यानंतर एकदा आयब्रो पेन्सिल ने सेट करून घ्या.

वॉटरप्रूफ मेकअप

चेहऱ्याला मेकअप सेट करताना नेहमी वॉटरप्रूफ प्रोडक्टचा वापर करा. तुमच्याकडे एेनवेळी जर वाॅटरप्रुफ नसेल तर अशावेळी नाॅर्मल मस्करा वॉटरप्रूफ करण्यासाठी लुझ पावडरचा वापर करा. यावर परत मस्करा लावून घ्या. अशा पध्दतीने मेकअप सेट करा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर लुज पावडरचा वापर करा.यावर आॅयली काॅम्पेक्ट चा उपयोग करा.

डार्क रंगाचा उपयोग करा

मेकअप करत असताना बेसिक गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. दिवसा मेकअप करत असताना स्पाॅफ्ट, न्यूड शेड्स चांगल्या वाटतात. रात्रीच्यावेळी रेड, डार्क पिंक, चेरी रेड शेड्स चांगले वाटतात.

loading image
go to top