Navratri Festival 2019 : नवरात्रोत्सवात घटाला वाहतात 'या' नऊ माळा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

Navratri Festival 2019 : पुणे : नवरात्रोत्सवाची सुरवात आज (रविवारी) आश्विन शुल्क पक्ष प्रतिपदेपासून घटस्थापनेने होणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते.

पुणे : नवरात्रोत्सवाची सुरवात आज (रविवारी) आश्विन शुल्क पक्ष प्रतिपदेपासून घटस्थापनेने होणार आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. या नवरात्रीत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्त्रोत्र म्हटली जातात.  या घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख, शांती अन्‌ समाधान लाभते.

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.
पहिली माळ - पिवळ्या फुले. शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या फुलांची माळ
दुसरी माळ - पांढरी फुले. अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या फुलांची माळ.
तिसरी माळ - निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या, फुलांच्या माळ.
चौथी माळ -  केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
पाचवी माळ - बेल किंवा कुंकवाची माळ 
सहावी माळ - कर्दळीच्या फुलांची माळ.
सातवी माळ - झेंडू किंवा नारंगीची फुलाची माळ
आठवी माळ - तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
नववी माळ - कुंकुमार्चनाची माळ वाहतात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flowers use for Ghat Sthapana Pooja in Navratri Festival 2019