esakal | जोतिबाचा उद्या जागर : मंदिर रात्रभर खुले ; Navratri 2021 News
sakal

बोलून बातमी शोधा

दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची पाच पाकळी सोहन कमळ पुष्पात महापूजा

नवरात्र उत्सवातील पाचव्या दिवशी देवाची पाच पाकळी सोहन कमळ पुष्पात समस्त दहा गावकर व पुजाऱ्यांनी महापूजा बांधली.

जोतिबाचा उद्या जागर : मंदिर रात्रभर खुले

sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा (Jotiba Tempal) उद्या (ता. १२) जागर होणार असून यानिमित्ताने मंदिर रात्रभर खुले असणार आहे. मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतील. आज बंदमुळे दिवसभर गर्दी राहिली. ई पास यंत्रणा कोलमडल्याने भाविकांना मुख व कळस दर्शनावरच समाधान मानावे लागले. दरम्यान, जोतिबाचा जागर झाल्याशिवाय इतर शक्ती देवतांचा जागर होत नाही. जोतिबाच्या जागर सोहळ्याला पारंपरिक महत्त्व आहे.

आज नवरात्र उत्सवातील पाचव्या दिवशी देवाची पाच पाकळी सोहन कमळ पुष्पात समस्त दहा गावकर व पुजाऱ्यांनी महापूजा बांधली. चोपडाईदेवी, यमाईदेवीची यांच्या कमळ पुष्पातील महापूजा बांधल्या. दरम्यान, आज सकाळी दहा वाजता मानाचा उंट घोडा सर्व देव सेवक यांच्या उपस्थितीत धूपारतीचा सोहळा ढोल, पिपाणी, सनईच्या गजरात मूळमाया श्री यमाई मंदिराकडे गेला.

देवस्थानचे अधीक्षक महादेव दिंडे श्रीचे पूजारी ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी सोहळा जोतिबा मंदिर ते मुख्य पायरी रस्ता मेन पेठ सेंटर प्लाझा या मार्गावरून गज गतीने गेला. या वेळी गावातील सुवासिनी महिलांनी सडारांगोळी काढून सोहळ्याचे स्वागत केले. सोहळ्यात सहभागी असणाऱ्यांना काही ग्रामस्थांनी सुगंधी दुधाचे वाटप केले. दुपारी बारा वाजता हा सोहळा पुन्हा मुख्य मंदिरात आला. त्यावेळी प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली.

ई पास, नाकाबंदीने नाकात दम

डोंगरावर भाविकांना इ पास दर्शन पद्धतीचा त्रास होत आहे. ठिकठिकाणी नाका बंदी केल्याने स्थानिक ग्रामस्थ पुजाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उद्या मात्र डोंगरावर जागर सोहळ्यामुळे जादा पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

loading image
go to top