navratri festival
navratri festival esakal

Navratri 2022:दुर्गा देवीच्या भक्ती उत्सवाला सुरुवात,जाणून घ्या घटस्थापनेची तारीख,शुभ मुहूर्त

चैत्र आणि शारदीय नवरात्रीमध्ये आईच्या पूजेला विशेष महत्त्व

Shardiya Navratri 2022: शारदीय नवरात्री, देवीच्या भक्तीचा उत्सव २६ सप्टेंबरपासून सुरू होत आहे, या दरम्यान घटस्थापनेनंतर ९ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.वर्षभरात ४ नवरात्र असतात, त्यात शारदीय नवरात्री, चैत्र नवरात्री आणि २ गुप्त नवरात्र असतात. चैत्र आणि शारदीय नवरात्रीमध्ये आईच्या पूजेला विशेष महत्त्व दिले जाते, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लोक घरात घटस्थापना करतात, जो ९ दिवस चालतो.

नवरात्रीच्या महत्वाच्या तारखा

नवरात्रीचा पहिला दिवस - २६ सप्टेंबर २०२२, सोमवार देवी शैलपुत्री

नवरात्रीचा दुसरा दिवस - २७ सप्टेंबर २०२२, मंगळवार - देवी ब्रह्मचारिणी

नवरात्रीचा तिसरा दिवस - २८ सप्टेंबर २०२२, बुधवार - देवी चंद्रघंटा

नवरात्रीचा चौथा दिवस - २९ सप्टेंबर २०२२, गुरुवार - देवी कुष्मांडा

नवरात्रीचा पाचवा दिवस - ३० सप्टेंबर २०२२, शुक्रवार - देवी स्कंदमाता

नवरात्रीचा सहावा दिवस - १ ऑक्टोबर २०२२, शनिवार - देवी कात्यायनी

नवरात्रीचा सातवा दिवस - २ ऑक्टोबर २०२२, रविवार - देवी कालरात्री

नवरात्रीचा आठवा दिवस - ३ ऑक्टोबर २०२२, सोमवार - देवी महागौरी

नवरात्रीचा नववा दिवस - ४ ऑक्टोबर २०२२, मंगळवार - देवी सिद्धिदात्री

विसर्जनाचा दिवस - ५ ऑक्टोबर २०२२, बुधवार - देवी दुर्गा मूर्ती विसर्जन

घटस्थापना शुभ मुहूर्त

प्रतिपदा तिथी प्रारंभ : २६ सप्टेंबर पहाटे ०३:२३ पासून ते 27 सप्टेंबर पहाटे ०३:०८ पर्यंत

घटस्थापना मुहूर्त - सकाळी ०६:२८ ते ८:०१पर्यंत

अभिजीत मुहूर्त - सकाळी ११:४८ ते १२:३६ पर्यंत

कलश स्थापनेची विधी

- कलश बसवण्यासाठी उत्तर-पूर्व दिशा निवडा.

- गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून जागा शुद्ध करा.

- लाकडी चौरंगावर स्वस्तिक बनवून घट बसवावा.

- घटाच्या खाली एक ताटली ठेवून त्यात माती टाका आणि त्यावर धान्य पेरा.

- घटात गंगाजल टाकून या पाण्यात दूर्वा, हळद-कुंकू, अक्षदा आणि नाणे टाका.

- घाटावर आंब्याची किंवा विड्याची ५ पाने लावून, नारळावर लाल कपडा गुंडाळून घाटावर ठेवावा.

- देवीच्या मूर्ती समोर ठेवा.

- यासह अखंड दिवा लावून ९ दिवस मातेची पूजा करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com