नवरात्री 2022: नवरात्रीचे उपवास अपचनाचे कारण ठरू शकतात,करा या टीप्स फॉलो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navratri news

Navratri 2022: नवरात्रीचे उपवास अपचनाचे कारण ठरू शकतात,करा या टीप्स फॉलो

तसे तर उपवास केल्याने आपले शरीर सुधारण्यास मदत होते. मात्र, काही वेळा उपवासामुळे शरीरातील ऑसिडीटीचे प्रमाण वाढण्यासोबतच अपचनाचाही त्रास सुरू होतो.

हे घडण्यामागचे कारण आणि ते रोखण्याचे उपाय जाणून घेऊया.

शारदीय नवरात्री २६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि ४ ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाचे विशेष महत्त्व मानले जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेचे भक्त उपवास करतात. उपवास शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जात असला तरी, छोट्याशा दुर्लक्षामुळेही आपल्या शरीरात काही समस्या निर्माण होतात. उपवासामुळे अनेकांना अॅसिडिटीची तक्रार असते, तसेच अपचनेची समस्या असते.

शरीरातील ऍसिडचे प्रमाण वाढणे आणि उपवासामुळे अपचन होण्याचे कारण मुख्यतः शरीराला पुरेसे फायबर न मिळणे हे आहे. याशिवाय एकदम खूप खाणे, जास्त कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे आणि रात्री उशिरापर्यंत जागी राहणे यामुळेही या समस्या उद्भवू शकतात.

नवरात्रीच्या उपवासात या गोष्टी लक्षात ठेवा

१. शरीराला हायड्रेट ठेवा

नवरात्र हा मातेच्या पूजेचा विशेष काळ मानला जातो. या दरम्यान तुम्हीही उपवास करत असाल तर लक्षात ठेवा की उपवास करताना शरीर कधीही डिहायड्रेशनचा शिकार होऊ नये. शरीराला हायड्रेट ठेवल्याने अपचनाची तक्रार राहणार नाही तसेच पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या टाळता येईल.

२. व्यायाम/ वर्कआऊट

उपवासाच्या वेळी जड वर्कआऊट टाळावेत, हलके व्यायाम शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी केले जाऊ शकतात. यामुळे खालच्या ओटीपोटात रक्त परिसंचरण वाढते, ज्यामुळे आतड्याची हालचाल सुधारते. यासाठी तुम्ही चालणे, धावणे आणि योगासने यासारखे व्यायाम निवडू शकता.

३. फायबर युक्त रिच फूड

उपवास करताना लोक अनेकदा असे पदार्थ खातात ज्यामध्ये फायबरचे प्रमाण खूपच कमी असते. शरीरातील ऍसिड वाढणे आणि अपचनाची तक्रार वाढण्याचे हे देखील एक मोठे कारण बनते. अशा परिस्थितीत, उपवासात सुका मेवा, फळे, साबुदाणा आणि ओट्स यांसारखे फायबरयुक्त पदार्थ खावे.

४. जेवणादरम्यान योग्य अंतर असावे

उपवासादरम्यान, बहुतेक लोक एकाच वेळी फळ खातात. त्याच बरोबर अनेक लोक एका वेळेस फळांसोबत इतर पदार्थ देखील खातात. अशा परिस्थितीत लक्षात ठेवा की जर तुम्ही उपवास केला असेल तर एकाच वेळी भरपूर अन्न खाणे टाळा

नवरात्रीत या पदार्थांचा आहारात समावेश करा

- शिंगोड्याच्या पिठापासून बनवलेले खाद्यपदार्थ

- साबुदाणा खिचडी किंवा खीर

- भगर

- दुग्धजन्य पदार्थ

Web Title: Navratri 2022 Constipation May Be Occur Due To Fasting These Tips Can Help

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..