Navratri 2022 : विधवा प्रथा न जुमानता स्वत:साठी जगायला लावणारी दुर्गा संगीता कांबळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navratri news

Navratri 2022 : विधवा प्रथा न जुमानता स्वत:साठी जगायला शिकवणारी दुर्गा संगीता कांबळे

हेही वाचा: Navratri Recipe: नवरात्र स्पेशल भगरची टिक्की कसे तयार करायच्या?

पतीच्या निधनानंतर विधवा झाल्यानंतर ज्या काही प्रथा आहेत त्यामुळे महिलेच्या सन्मानाने जगण्याच्या हक्कावर काही प्रमाणात गदा येत असल्याने अनेक ग्रामपंचायतीनी विधवा प्रथा बंद केल्या. पण कोल्हापूर मधील एक दुर्गा अशी आहे जिने त्याआधीच या प्रथा न जुमानता समाजात परिवर्तन घडवले. आज ऐकूया तिची कहाणी

मी संगीता गुणवंत कांबळे,माझं माहेर सांगली असून सासर कोल्हापूर पण आयुष्यातील 35 वर्ष आम्ही मुंबईला राहिलो आहे. मिस्टरांच्या रिटायरमेंटनंतर आम्ही पुन्हा कोल्हापूरमध्ये शिफ्ट झालो. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. कोरोनाने सगळ्यांच्या जवळच कोणी न कोणी हिरावून नेलं तस माझ्या पतीचेही निधन झाले.

हेही वाचा: Navratri 2022: अष्टमी पूजा करताना शास्र शुध्द पद्धतीने होमहवन कसे करावे?

हा खूप भावनिक आणि अगदी कोलमडून पडणारी घटना होती. आयुष्याची 35 वर्ष एकत्र राहिल्यानंतर अचानक त्यांच माझ्यासोबत नसणं स्वीकारणं खूप अवघड होतं माझ्यासाठी. त्यामुळे त्यांचे सगळे विधी उरकल्यावर मी त्या प्रथा पाळायला विरोध केला. आयुष्यभर ज्याची साथ होती ते सोडून गेले. पण, त्यांच्या आठवणी मी माझ्यापासून दूर करणार नाही,अशी भूमीका मी त्यावेळी घेतली.

माझे हे रूप पाहून सगळेच अवाक झाले. त्यांना वाटत होतं आता पतीचे निधन झालं आहे तर तू विधवा रूप धारण कर. पूर्वी सती प्रथा होती. पतीच्या निधनानंतर त्याच्याच चितेवर उडी घेत पत्नीनेही आयुष्य संपवायचे. पण आता असलेल्या या प्रथा त्याहून वाईट म्हणायच्या. एखादीच्या पतीचे निधन झाले तर तिसर्‍या दिवशी महिला नुसत्या तुटून पडतात. बांगड्या फोडतात. मंगळसूत्र तोडतात. हे करताना तिच्या मनाचा विचार करायला हवा.

हेही वाचा: Navratri 2022: नवरात्रामध्ये अष्टमीला का असते इतके महत्त्व?

पतीचे निधन झाले की, सौभाग्य अलंकार घालायचे नाहीत. टिकली,बांगड्या, कलरफुल साड्या घालायच्या नाहीत. होईल तेव्हढं साधे रहायचे. पण या गोष्टी करून महिलांना काय काय ऐकावं लागत, किती वाईट नजरा सहन कराव्या लागतात. कोणत्या कार्यक्रमात जाता येत नाही. मनासारखं काही करता येत नाही. यामुळे त्या स्त्रीला अधिकच मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. मग ज्या प्रथा आपल्याला आरोग्यासाठी हानिकारक ठरत असतील.

मला डान्स,अभिनयाची आवड आहे. मी सध्या मी काही टीव्ही सीरिअल्समध्येही काम करतेय. तर सेटवर लोकांना माहिती नव्हती की माझे मिस्टर वरले आहेत. जेव्हा मीच ही गोष्ट त्यांना सांगते तेव्हा समजलं की ते कौतुक करतात. तू अशीच रहा, अस म्हणतात.

हेही वाचा: Shardiya Navratri 2022 : जल्लोष गरबा; दांडियाला महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

मी हा निर्णय केवळ माझ्या पतीमुळे घेऊ शकले. आमचे वैवाहिक आयुष्य अतिशय आनंदी गेलं. ते नेहमीच सांगायचे की, नवरा किंवा बायको दोघांपैकी एकाचा मृत्यू आधी होणार. त्यामुळे मी आधी गेलो तरी तू स्वत:मध्ये बदल करू नको, असे त्यांचे विचार होते. त्यामुळेच आता मला असं वाटतं की, एक माणूस निघून गेल्यावर आयुष्य बदलत नाही. त्यामुळे पतीच्या निधनानंतर काही गोष्टीत बदल होतो. पण, तो तूम्हाला पटेल असा करा. काही महिला स्वत:च याला विरोध करतात. काही समाजाला घाबरून त्या रूढी स्विकारतात. तसेच, माझे वडील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सानिध्यात वाढलेले होते. त्यामुळे त्यांनी मलाही लहानपणापासून चळवळ, समाज विरुद्ध जाण या गोष्टी शिकवल्या होत्या.

हेही वाचा: Navratri 2022: चंद्रपूर श्री महाकाली देवीचा इतिहास

शाहु स्मारकला एक कार्यक्रम झाला होता. त्याठीकाणी मी महिलांचे प्रबोधन केले होते. त्यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी मला सांगितले की, विधवा महिलांवर आत्याचार होतोय असं समजलं किंवा तस काही वाटलं तर मला येऊन सांगा. आपण त्यावर काहीतरी ऍक्शन घेऊ.

विधवा महिलेला आधार नसतो,त्यामुळे पती नंतर तीच तिला करायचं असत त्यामुळे महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. सामाजिक पातळीवरही त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे यासाठी मी काम करणार आहे.