Navratri 2023 : अष्टमीला देवीच्या जागराला करा काळ्या चन्याची उसळ, जाणून घ्या रेसिपी

आज आपण काळ्या चण्याची उसळ कशी बनवायची ते पाहुयात.
Navratri
Navratri sakal

नवरात्रीच्या शेवटच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात एक खास रेसिपी तयार केली जाते. लहान मुलींची पूजा केली जाते आणि त्यांना हलवा, पुरी आणि काळ्या चन्यासोबत नारळ आणि दक्षिणा दिली जाते. ही एक महत्त्वाची परंपरा आहे, जी या दिवशी उपवास करणारे सर्व लोक पाळतात.

प्रसादात बनवलेले काळे चणे सहसा ड्राय असतात. अष्टमी किंवा नवमीला बनवलेली ही थाळी खूप पौष्टिक असते. पुरी, हलवा आणि काळे हरभरे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला काळे चणे 3 वेगवेगळ्या प्रकारे कसे बनवू शकता हे सांगणार आहोत.

मसालेदार काळ्या चन्याची उसळ

लागणारे साहित्य-

  • दीड कप काळा हरभरा

  • १/२ टीस्पून जिरे

  • एक चिमूटभर हिंग

  • १ हिरवी मिरची

  • १ कप पाणी

  • १/२ टीस्पून आले

  • चवीनुसार मीठ

  • १ चमचा तेल किंवा तूप

  • 1/4 टीस्पून गरम मसाला

बनवण्याची पद्धत-

  • काळे हरभरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी शिजवा.

  • कुकरमध्ये तूप गरम करून त्यात जिरे आणि हिंग टाका आणि फोडणी द्या.

  • यानंतर आले आणि हिरवी मिरची घालून ५-७ मिनिटे परतावे. आता त्यात काळे हरभरे घालून 7-10 मिनिटे चांगले परतून घ्या.

  • कुकरमध्ये पाणी घाला आणि 1-2 शिट्ट्या होऊ द्या. काळे हरभरे आणखी थोडा वेळ शिजवा.

  • नंतर त्यात गरम मसाला घालून मिक्स करा. वरून हिरवी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

Navratri
Navratri 2023 : सातवी माळ; भूत,पिशाश्चाचा सर्वनाश करणारी माता काळरात्री, देवीला हाच नैवेद्य द्या

पंजाबी स्टाईलमध्ये काळ्या चन्याची उसळ

लागणारे साहित्य-

  • 1 कप काळे हरभरे

  • २ चमचे तूप

  • 1 टीस्पून जिरे

  • 1 कप बारीक चिरलेला टोमॅटो

  • 1 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • १/२ टीस्पून आले

  • 1 टीस्पून लाल मिरची पावडर

  • 1/2 टीस्पून धने पावडर

  • चवीनुसार मीठ

  • 1 कप क्रीम

  • 1 टीस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली

बनवण्याची पद्धत-

  • काळे हरभरे रात्रभर भिजत ठेवा आणि मध्यम आचेवर दोन शिट्ट्या करा. 

  • आता कुकरमध्ये तेल आणि तूप घालून गरम करा. त्यात जिरे आणि हिंग टाका. यानंतर आले आणि हिरवी मिरची घालून १० सेकंद परतावे.

  • त्यात तिखट, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करा. जेव्हा मसाल्यांना सुगंध येऊ लागतो तेव्हा त्यात ताजी टोमॅटो प्युरी घाला आणि मसाल्यामध्ये मिसळा.

  • मसाल्याला तेल सुटू लागले की त्यात काळे हरभरे घालून मिक्स करा. आता त्यात पाणी घालून ५-६ शिट्ट्या वाजू द्या.

  • नंतर त्यात क्रीम घालून मिक्स करा. वर गरम मसाला आणि कोथिंबीर घालून रोटी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

तडका काळा चना रेसिपी

लागणारे साहित्य-

  • 250 ग्रॅम काळा हरभरा

  • 1 टीस्पून मीठ

  • २ कप पाणी

  • १ चमचा तूप

  • 1 टीस्पून जिरे

  • मसाला मिक्स करण्यासाठी

  • 1/2 टीस्पून हळद पावडर

  • 1 टीस्पून काश्मिरी लाल तीखट

  • 1 टीस्पून चना मसाला

  • १/२ कप गरम पाणी

  • 1/4 टीस्पून गरम मसाला

  • १ टेबलस्पून अमचूर पाउडर

  • 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर

  • २ हिरव्या मिरच्या

  • कोथिंबीर

तडका बनवण्यासाठी

२ चमचे तूप

एक चिमूटभर हिंग

1 टीस्पून लाल मिरची पावडर

बनवण्याची पद्धत-

  • काळे हरभरे रात्रभर भिजत ठेवा आणि मध्यम आचेवर दोन शिट्ट्या करा. 

  • यानंतर कढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि चिमूटभर हिंग टाका.

  • आता एका भांड्यात स्पाइस मिक्स घालून मिक्स करा आणि एका पॅनमध्ये ठेवा आणि सुमारे 2 मिनिटे तळा.

  • कढईत हिरवी मिरची आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा. यानंतर हरभरा पाण्यासोबत टाकून पाणी सुकेपर्यंत परतून घ्या.

  • वरून अमचूर पाउडर टाकून अजून थोडा वेळ शिजवा. दुसरीकडे कढईत तूप गरम करून त्यात हिंग आणि तिखट घालून मिक्स करा. गरमागरम पुरीसोबत सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com