Navratri 2023 : नवरात्रौत्सवात परफेक्ट लूक हवाय? मग 'या' मेकअप टिप्सची घ्या मदत

नवरात्रौत्सवात परफेक्ट लूक आणि मेकअप करण्यावर महिलांचा भर असतो.
navratri makeup
navratri makeup esakal
Updated on

Navratri 2023 : आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. आज घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे, सर्वत्र उत्साहाचे आणि भक्तीभावाचे वातावरण पहायला मिळत आहे. देशभरात नवरात्रीच्या या ९ दिवसांमध्ये देवीच्या ९ रूपांची भक्तीभावाने पूजा केली जाते.

सर्वत्र उत्साहाचे आणि मांगल्याचे वातावरण असते. या ९ दिवसांमध्ये देवीच्या पूजेसाठी आणि दांडियासाठी विविध लूक्स करण्यावर महिलांचा भर असतो. या लूकसोबत मग हेअरस्टाईल्स आल्या, विविध प्रकारचे आऊटफिट्स आले. या सगळ्यासोबतच परफेक्ट मेकअप लूक करण्यावर ही तरूणींचा भर असतो.

खास शारदीय नवरात्रौत्सवासाठी महिलांनी झटपट मेकअप कसा करावा? यासाठी काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात या मेकअप टिप्स.

navratri makeup
BB And CC Creams : बीबी क्रीम आणि सीसी क्रीममध्ये फरक काय? दोन्हींचे ‘हे’ फायदे घ्या जाणून

बेस लावून चेहरा तयार करा

नवरात्रौत्सवासाठी मेकअप करताना सर्वात आधी चेहरा चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घ्या. त्यानंतर, चेहऱ्यावर प्रायमर लावून चेहरा मॉईश्चराईझ करून घ्या. त्यानंतर, तुमच्या स्किनटोननुसार चेहऱ्यावर बेस लावून घ्या. हा बेस लावताना तो जास्त डार्क असता कामा नये, याची काळजी घ्या. हा बेस शक्यतो लाईट शेडमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा.

डोळ्यांचा मेकअप महत्वाचा

मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप हा सर्वात महत्वाचा भाग आहे. डोळ्यांचा मेकअप जर सुंदर असेल तर तुमचा लूक आपोआप सुंदर दिसणार आहे. डोळ्यांना आधी काजळ लावून घ्या. त्यानंतर तुमच्या आऊटफीटला मॅच होणारे आयलायनर डोळ्यांना लावा. दांडिया नाईटसाठी जाणार असालं तर डोळ्यांच्या मेकअपला ग्लिटरी टच देण्यास विसरू नका.

navratri makeup
How to Apply Concealer : कन्सिलर म्हणजे काय ? कन्सिलर लावण्याची ‘ही’ योग्य पद्धत घ्या जाणून

ब्लश आणि हायलायटर

त्वचेवर ग्लो दिसण्यासाठी ब्लश आणि हायलायटरचा वापर करणे महत्वाचा आहे. सर्वात आधी गालांवर ब्लश लावा. ब्लश लावल्यानंतर गालांवर हायलायटर लावा. आता बघा चेहरा कसा चमकदार दिसतो ते.

navratri makeup
Makeup Brush : मेकअप ब्रशची योग्य निवड करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

लिपस्टिक शिवाय मेकअप अपूर्ण

लिपस्टिक हा मेकअपचा अतिशय महत्वाचा भाग आहे. लिपस्टिकशिवाय मेकअप अपूर्ण आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. तुमचा संपूर्ण मेकअप झाल्यानंतर आता तुमच्या आवडीनुसार किंवा आऊटफीटनुसार तुमची आवडती लिपस्टिक लावा.

लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप बाम लावायला विसरू नका आणि लिपस्टिक लावल्यानंतर ओठांवर लिपग्लॉसचा वापर अवश्य करा.

navratri makeup
Navratri Special Hairstyles : नवरात्रीला स्पेशल लूक करायचा आहे? मग ‘या’ हेअरस्टाईल्सची घ्या मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com