Navratri Fashion : यंदा नवरात्रीच्या गरब्यात गाजणार मराठी पैठणीचा स्वॅग ; पहाच या अभिनेत्रींचा क्लासी लुक

गर्भरेशमी संपूर्ण जरीचा पदर आणि दोन्ही बाजूला रूंद व ठसठशीत वेलबुट्टीचे काठ ही पैठणीची ओळख
Navratri Fashion : यंदा नवरात्रीच्या गरब्यात गाजणार मराठी पैठणीचा स्वॅग ; पहाच या अभिनेत्रींचा क्लासी लुक

पुणे : गर्भरेशमी संपूर्ण जरीचा पदर आणि दोन्ही बाजूला रूंद व ठसठशीत वेलबुट्टीचे काठ, ही पैठणीची ओळख आहे. कितीही व्हरायटीच्या साड्या असल्या तरी आपल्या कपाटात एकतरी पैठणी असावी ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण, आताच्या तरूणींना साड्यांची कमी आवड आहे. त्यांच्यासाठीच आता पैठणीचे ड्रेस आले आहेत. यंदाच्या नवरात्रित गरब्यासाठी पैठणी लेहंगे आले आहेत.

नवरात्रिसाठी तरूणींचे शॉपिंग सुरू झाले आहे. पण, बाजारात तेच तेच डायमंड, जरदोशी आणि कुंदन वर्क असलेले घागरे उपलब्ध आहेत. त्यामुळे दांडीया गृपमध्ये काहीतरी हटके करायचे असेल तर तूम्ही या मराठी अभिनेत्रींसारखा पैठणी लेहंग्याचा विचार नक्की करू शकता.

मराठी अभिनेत्री सई लोकूरला लेहंगा प्रचंड आवडतो. तिने अनेक रंगाचे पैठणीचे लेहंगे ट्राय केले आहेत. काळ्या आणि क्रीम कलरच्या लेहंग्यात ती अधिकच खुलून दिसत आहे. यावर तिने ब्लॅक कतरची एथनिक ज्वेलरी घातली आहे.

मराठी अभिनेत्री मानसी नाईकलाही या लेहंग्याची भुरळ पडली आहे. मानसीनेही जांभळ्या रंगातील पैठणी लेहंग्यावर फोटोशुट केले आहे. या लुकवर तिने मॅचिंग मोती सेट आणि बॅंगल्स घातल्या आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनेही वेगळा लुक करत साडी लेहंग्यावर फोटाशूट केले आहे. यात तिने साउथ इंडीयन ज्वेलरी आणि पैठणी यांत प्राजक्ताचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

जुन्या पैठणीचा लेहंगा

स्त्रियांकडे अनेक प्रकारच्या साड्या असतात. त्यात हौस म्हणून पैठणी विकत घेतात, पण एखाद्या कार्यक्रमासाठी घेतलेली साडी महिला फार फार तर दोन ते तीन वेळा नेसतात. त्यामुळे कालांतराने त्या तशाच पडून राहतात. पैठणी घागरे बाजारात ६ ते ८ हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्यामुळे याच पैठणीचा तुम्ही लेहंगा तयार करु शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com