Navratri Festival 2019 : चौसष्ट योगिनी

सरोजिनी चव्हाण
Thursday, 3 October 2019

नवरात्री चौसष्ट या संख्येवर आधारित अनेक तर्क मानले गेले आहेत. यातील एक म्हणजे चौसष्ट कला! आदिशक्ती स्वतःच चौसष्ट कलांची भोक्ती असून तिला चतुःषष्टी कलामयी असे ही मानले जाते. योगिनी उपासना विस्तारण्यात नवनाथांनी मोठा हातभार लावला. मच्छिंद्रनाथांनी ‘योगिनीकौल संप्रदायाची’ स्थापना करून योगिनींना व स्त्रीवर्गाला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून दिले.

नवरात्री चौसष्ट या संख्येवर आधारित अनेक तर्क मानले गेले आहेत. यातील एक म्हणजे चौसष्ट कला! आदिशक्ती स्वतःच चौसष्ट कलांची भोक्ती असून तिला चतुःषष्टी कलामयी असे ही मानले जाते. योगिनी उपासना विस्तारण्यात नवनाथांनी मोठा हातभार लावला. मच्छिंद्रनाथांनी ‘योगिनीकौल संप्रदायाची’ स्थापना करून योगिनींना व स्त्रीवर्गाला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून दिले.

भारतीय पूजापद्धतीवर योगिनींचा विशिष्ट प्रभाव आहे. योगिनींसंदर्भातील पुराणे, योगिनीतंत्र, प्रचलित कथा वाङ्‌मय पुरातत्वशास्त्रीय पुरावे, शिलालेख आदींचा अभ्यास केला तर असेच आढळेल की योगिनीची नावे, कार्य, मंदिरे, मूर्तीची रचना, आसनपद्धती या सर्वांमध्ये अतिशय वैविध्य आहे. योगिनी हा विषय मुळातच गूढ, गहन व क्‍लिष्ट आहे. त्यांची माहिती वा योगिनी विषयीच्या कथाही वेगवेगळ्या ग्रंथात वेगवेगळ्या आहेत. 

योगिनीतंत्रामध्ये योगिनींच्या उत्पत्तीविषयीची कथा दिली आहे- एकदा महादेवांनी माहेश्‍वरीला विचारले की, ‘विश्‍वामध्ये राहण्यासाठी अजिबातच ठिकाण नसेल तर तू कुठे राहशील?’ महादेवांच्या या उपरोधिक प्रश्‍नाने देवी क्रोधीत झाली व म्हणाली, ‘हे सर्व जगत माझ्यामुळेच उत्पन्न, विस्तारित होत असते व नाश पावत असते. या जगताची शक्ती मीच आहे, इतकेच काय तुमचीही शक्ती मीच आहे.’ या उत्तरामुळे भगवंत व्यथित झाले व निर्जनस्थळी निघून गेले, तेथे त्यांनी ‘महाघोर’ नामक अद्‌भुत अशा राक्षसाची निर्मिती केली. देवीने दैत्याचे खरे स्वरूप जाणले व म्हणाली, ‘मीच सृष्टीचे पालन करते, मला प्रसन्न करण्यासाठी तू खूपच तपश्‍चर्या केली आहेस. तू एकान्त चित्ताने माझ्याबद्दल अभिलाषा बाळगलीस, याचा अर्थ तू नि:संदेह शिव आहेस. आता तू माझे ब्रह्मानंद रूप पहा.’ असे म्हणून देवीने त्वरित उग्र काळी रूप धारण केले आणि तिच्या रश्‍मी बिंदूमधून अत्यंत तेजस्वी अशा करोडो योगिनींची चारी दिशांना निर्मिती झाली. 

साधारणपणे नवव्या ते तेराव्या शतका दरम्यान मध्य व पूर्व भारतात, तेही ओरिसा, मध्य प्रदेश आणि काही प्रमाणात गुजरात, राजस्थानमध्ये योगिनी मंदिरांची उभारणी झाल्याचे आढळते. यातही काही ठिकाणी ८१ योगिनी मंदिरे, काही ठिकाणी ६४, तर काही ठिकाणी ४२ योगिनी मंदिरे आहेत.

भेडाघाट येथील योगिनी मूर्ती एकंदरीत ९५ आहेत. योगिनींविषयीच्या गैरसमजांमुळे, त्यांच्याबद्दलच्या भीतीयुक्त दराऱ्यामुळे बरीचशी योगिनी मंदिरे सामान्य जणांकडून दुर्लक्षित राहिली. त्या काळी योगिनींविषयी कमालीची गुप्तता पाळली जात असे, इतकी की, भुवनेश्‍वरजवळील हिरापूर योगिनी मंदिर तेथील लोकांना बरीच वर्षे माहीत नव्हते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 article sarojini chavan