Navratri Festival 2019 : श्रीविद्या ही एक प्रमुख उपासना...

सरोजिनी चव्हाण
Friday, 4 October 2019

श्रीविद्येतील श्रीचा वापर मातृशक्तीसाठी केला जातो की जिची विश्‍वावर अधिसत्ता आहे.त्वं श्री त्वं ईश्‍वरी-सप्तशती, श्रीविद्या ही शाक्तसंप्रदायाच्या अनेक उपासनाप्रकारांपैकी एक प्रमुख विद्या आहे. श्रीविद्येचे मुख्य आचार्य भगवान दत्तात्रेय मानले जातात.

श्रीविद्येतील श्रीचा वापर मातृशक्तीसाठी केला जातो की जिची विश्‍वावर अधिसत्ता आहे.त्वं श्री त्वं ईश्‍वरी-सप्तशती, श्रीविद्या ही शाक्तसंप्रदायाच्या अनेक उपासनाप्रकारांपैकी एक प्रमुख विद्या आहे. श्रीविद्येचे 
मुख्य आचार्य भगवान दत्तात्रेय मानले जातात. 

त्रिपुरा तत्त्वाचे विवेचन करणारी  अष्टादशसहस्री ‘दत्तसंहिता’ श्रीदत्तात्रेयांनी लिहिली. आद्यशंकराचार्यही श्रीविद्येचे विशेष आचार्य होते. त्यांनी सौंदर्यलहरी, ललितांत्रीशतीभाष्य हे ग्रंथ लिहिले आहेत.

भावनोपनिषदात असे म्हटले आहे, की श्रीविद्या उपासनेद्वारे साधकांमध्ये अंतर्भूत असणाऱ्या भावनांना व शक्तीला श्रद्धापूर्वक वाट करून देता येते. विचारांमध्ये सुसंगती आणण्यासाठी, भावनांवर संयम मिळविण्यासाठी, अंतर्गत व बाह्यशक्ती तत्त्वांमध्ये साधर्म्य साधण्यासाठी श्रीविद्या उपासनेचा सर्वश्रेष्ठ उपयोग आहे. 

श्रीविद्येचे आसन पंचआम्नाय मानले जाते. कादि विद्या, हादी विद्या व कहादी विद्या, हे श्रीविद्येचे तीन प्रकार आहेत. यातील श्रीचा अर्थ फक्त लक्ष्मी असा नसून, श्रीललितामहात्रिपुरसुंदरी असाही आहे. तिची उपासना तीन प्रकारे करता येते.  महापद्मवनातदेवी शिवाच्या मांडीवर बसली आहे, असे कल्पून तिचे ध्यान- पूजन करणे, शाक्तपंथाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे व श्रीयंत्राच्या रूपाने पूजा करणे. श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचे तत्त्व प्रतिपादन करण्याऱ्या या विद्येमध्ये श्रीयंत्रपूजन महत्त्वाचे आहे. श्रीविद्येची शक्ती त्रिगुणात्मक आहे, म्हणून तिला त्रिपुराशक्ती असेही म्हणतात.

त्रिपुरा या नावामध्येच ब्रह्मा-विष्णू-महेश यांची शक्ती, अग्नी-सूर्य-चंद्र यांचे तेज, स्वर्ग-मर्त्य-पाताळ हे लोक, धर्म-अर्थ-काम हे तीन वर्ग असे सर्व सामावलेले आहे. तिच्यातील त्रिगुणात्मक शक्ती जेव्हा व्यक्त होते तेव्हा ती महासरस्वती- महाकाली-महालक्ष्मी, ऋद्धी-सिद्धी -ऐश्‍वर्य, ज्ञानशक्ती-इच्छाशक्ती-क्रियाशक्ती अशी त्रिविध रूपे धारण करते. या शक्तींनाच आद्याशक्ती असे म्हटले आहे. श्रीविद्या उपासनेचा महत्त्वाचा नियम म्हणजे श्रद्धापूर्वक, पवित्र अंतःकरणाने, शुद्ध मनाने स्वतः देव बनून भगवंताची पूजा करणे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 article sarojini chavan