
नवरात्रोत्सवाला आज (रविवार)पासून पारंपरिक उत्साहात प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांत वेगळी वाट चोखाळत यशोलौकिकाच्या शिलेदार ठरलेल्या कोल्हापूरच्या रणरागिणींविषयी आजपासून...
नवरात्रोत्सवाला आज (रविवार)पासून पारंपरिक उत्साहात प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रांत वेगळी वाट चोखाळत यशोलौकिकाच्या शिलेदार ठरलेल्या कोल्हापूरच्या रणरागिणींविषयी आजपासून...
संभाजीनगर परिसरातील ही तरुणी. तिला बाईकचं प्रचंड वेड. याच वेडातून ती केवळ देशातच नव्हे तर जगभरातील विविध ठिकाणी सोलो बाईक रायडिंग करते आहे. विविध स्पर्धांत बक्षिसांची लयलूटही करते आहे. या फर्स्ट फिमेल इंटरनॅशनल बाईक रायडरचं नाव आहे, गायत्री पटेल. गायत्रीचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल आणि त्यानंतर भारती विद्यापीठ व कॉमर्स कॉलेजमध्ये झालं. २०१७ मध्ये तिनं बाईक रायडिंगचा संकल्प केला आणि कोल्हापूर ते कन्याकुमारी हा तीन हजार ७०० किलोमीटरचा ट्रॅक पूर्ण केला. त्याच अनुभवाच्या जोरावर एक महिना कोल्हापूर ते लेह-स्पीति कोल्हापूर हा तब्बल आठ हजार किलोमीटरचा ट्रॅकही तिने पूर्ण केला. २०१८ मध्ये तिने दिल्ली- लडाख- कोल्हापूर हा पाच हजार किलोमीटरचा, तर राजस्थान-कोल्हापूर हा ट्रॅकही तिने यशस्वीरीत्या पूर्ण केला. याच वर्षी तिने कोल्हापूर ते भूतान ही सात हजार किलोमीटरची राईड यशस्वीपणे पूर्ण केली. यंदा कोल्हापूर ते अंदमान ही राईड तिने केली आणि त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
गायत्री सांगते, ‘‘मुलींसाठी काहीही अशक्य नसते. तिने एकदा मनाशी संकल्प केला, की त्यात ती यशस्वी होते. हजारो किलोमीटरचा प्रवास करताना कठीण रायडिंगचा प्रसंगही येतो. मात्र, त्यावरही मात करता येते. मात्र, मोठ्या पल्ल्याच्या राईडवेळी त्या-त्या ट्रॅकचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.’’