नवरात्रोत्सवात जोतिबा देवाची सोहन कमळ पुष्पात महापूजा 

निवास मोटे
Friday, 27 September 2019

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी (जोतिबाचा डोंगर ) येथे नवरात्र उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यंदा नवरात्रोत्सवात नऊ दिवस श्रींच्या सोहन कमलपुष्पातील महापूजा बांधल्या जाणार आहेत.

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी (जोतिबाचा डोंगर ) येथे नवरात्र उत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यंदा नवरात्रोत्सवात नऊ दिवस श्रींच्या सोहन कमलपुष्पातील महापूजा बांधल्या जाणार आहेत.

या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे या पूजा अतिशय देखण्या व डोळ्याची पारणे फेडणाऱ्या असतात. डोंगरावरील पुजारी वर्ग ही वैशिष्ट्यपूर्ण पुजा बांधतात. कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यासाठी पुजारीवर्गास दोन तास लागतात. गावातील दहा गावकर या संबंधीचे नियोजन करतात.

रविवारी डोंगरावर नवरात्र उत्सव सुरू होईल. मुख्य मंदिरात सनई ढोल ताशा यांच्या गजरात पारंपरिक पध्दतीने घटस्थापनेचा विधी होईल. त्यानंतर धुपारती सोहळा यमाई मंदिराकडे सर्व लवाजम्यासह जाईल. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जोतिबा मंदिरातील शिखरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Jotiba Dev Sohan Kamal Puja