Navaratri 2022 : देवीला वारानुसार अर्पण करा हे नैवेद्य; जाणून घ्या महत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navaratri 2022

Navaratri 2022 : देवीला वारानुसार अर्पण करा हे नैवेद्य; जाणून घ्या महत्व

Sharadiya Navaratri 2022 : शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून (ता. 26) सुरुवात झाली आहे. घरोघरी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांसह आपल्या कुलदेवतेचे आगमन होत असून पुजेची तयारी सुरू आहे. देवीच्या घटस्थापनेची पुजा केल्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण केला जातो. देवीला कुठल्या वारी कोणता नैवेद्य अर्पण करावा हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेवू नवरात्राच्या नऊ दिवसांत देवीला वारानुसार कोणता नैवेद्य अर्पण करावा. (Sharadiya Navaratri Ghatsthapan 2022 Spiritual importance of naivedya as per day)

हेही वाचा: नवरात्रीच्या नऊ दिवसांत करा आर्थिक नियोजन....

घरोघरी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा केला जातो. घरोघरी देवीची मनोभावे पुजा- अर्चा करुन देवीला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. नवरात्राच्या नऊ दिवसांत प्रत्येक वाराला नैवेद्याचा एक पदार्थ हा विशेष महत्वाचा मानला जातो. प्रत्येक वाराच्या नैवेद्याचे महत्व हे देवी भागवतात सांगितले आहे. त्यानुसार देवीला प्रत्येक वारी कोणते नैवेद्य दाखवावे ते पाहूया.

navratri festival 2022

navratri festival 2022

हेही वाचा: Navratri 2022 : व्रत करण्याआधी जाणून घ्या हे नियम; नाहीतर कराल पश्चाताप!

नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे -

रविवार - पायस(खीर)

सोमवार - गायीचे तूप

मंगळवार - केळी

बुधवार - लोणी

गुरुवार - खडीसाखर

शुक्रवार - साखर

शनिवार - गायीचे तूप.

हेही वाचा: Navratri Fasting: नवरात्रीचे उपवास करताय? मग प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी खा 'या' गोष्टी