Navratri 2022 : या वयाच्या कुमारिकांचे करा पुजन; पुराणात आहे विशेष महत्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri 2022

Navratri 2022 : या वयाच्या कुमारिकांचे करा पुजन; पुराणात आहे विशेष महत्व

Navratri 2022 : शारदीय नवरात्र उत्सवाच्याकाळात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, दुर्गा देवी यांसह आपल्या कुलदेवते घरोघरी मोठ्या भक्तीभावाने पुजन केले जाते. याकाळात कुमारिकापुजनाला विशेष महत्व आहे. नवरात्राच्या नऊ दिवसांच्या काळात किंवा आपल्या कुळाचाराप्रमाणे कुमारिका पुजन व त्यांना भोजन देवू शकतो. विशिष्ट वयाच्या कुमारिकेचे पुजेसाठी महत्व अन् त्यातून होणारी विशेष फलप्राप्ती पुराणात सांगितले आहे. हे जाणून घेण्यासाठी हा लेख पुर्ण वाचा.

(Shardiya Navratri Ghatasthapana 2022 Kumarika pujan importance in ved puran)

हेही वाचा: Navratri 2022: साडेतीन शक्तीपीठाचा इतिहास नेमका काय आहे?

कुमारिकापुजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे. शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी किंवा आपल्या कुळाचाराप्रमाणे कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे. स्कंद पुराणात कुमारिकेच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार सांगितले आहेत. प्रत्येक वयोगटातील कुमारिका ही एका देवीच्या स्वरुपात आपल्याकडे येते. स्कंद पुराणात कुमारिकेच्या वयानुसार कुमारिकेचे प्रकार ते पुढील प्रमाणे -

२ वर्षाची- कुमारी

३ वर्षाची -त्रिमूर्तीनी

४ वर्षाची -कल्याणी

५ वर्षाची - रोहिणी

६ वर्षाची -काली

७ वर्षाची -चंडिका

८ वर्षाची -शांभवी

९ वर्षाची - दुर्गा

१० वर्षाची-सुभद्रा

हेही वाचा: Navratri 2022: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? कारण राक्षसांशी संबंधित आहे

Shardiya Navratri 2022

Shardiya Navratri 2022

आपण स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वयोगटानुसार कुमारिकेचे प्रकार व त्यासंबंधी देवीचे रुप जाणून घेतले. आता या कुमारिकांचे पुजन केल्यानंतर कुठले फळ आपल्याला मिळते ते आपण जाणून घेवू या...

कुमारिकापूजनाचे फळ पुढीलप्रमाणे -

१ कुमारिका पूजन- ऐश्वर्यप्राप्ती

२ कुमारिका पूजन-- भोग व मोक्ष प्राप्ती

३ कुमारिका पूजन -- धर्म व अर्थ प्राप्ती

४ कुमारिका पूजन-- राज्यपदप्राप्ती

५ कुमारिका पूजन-- विद्या प्राप्ती

६ कुमारिका पूजन-- षट् कर्म सिद्धी

७ कुमारिका पूजन---राज्य प्राप्ती

८ कुमारिका पूजन--संपत्ती

९ कुमारिका पूजन--पृथ्वीचे राज्य मिळते.

विवेचन - पं. नरेंद्र धारणे, नाशिक. (धर्म अभ्यासक)

हेही वाचा: Shardiya Navratri 2022: शारदीय नवरात्र निमित्त जाणून घ्या नवरात्र का साजरी केली जाते?