आले गणराय : संगमेश्वरातील पहिला मानाचा गणपती गुरुवारी येणार या पेशवेकालीन परंपरा असणाऱ्या वाड्यात

प्रमोद हर्डीकर
Tuesday, 18 August 2020


चौसोपी वाडा वरची आळी, देवरुख उत्सव होणार साधेपणाने

साडवली (रत्नागिरी) : यंदाचा गणेशोत्सव कोरोना काळातील असल्याने या उत्सवावर बरीच बंधने आली आहेत.संगमेश्वर तालुक्यात मानाचा येणारा पहीला गणपती गुरुवारी २० तारखेला प्रतिपदा व्दितियेला येणार आहे.

पंतभाउ जोशी यांच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला पेशवेकालीन परंपरा आहे.नवसाला पावणारा श्री सिध्दीविनायकाचे हे स्थान आहे. मोरगावच्या गणेशोत्सवाप्रमाणे येथील गणोशोत्सव साजरा केला जातो.
प्रतिपदेला येणारा गणपती यंदा अमावस्येमुळे प्रतिपदा व्दितीयेला येणार आहे. कोरोना काळात सण,उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आल्याने यंदा हा गणपती साधेपणाने नेला जाणार आहे. अश्वारुढ श्री गणराय,सोबत रिद्धी -सिद्धी व भालदार चोपदार असा या गणेशमूर्तीचा थाट असतो.दरवर्षी वाजत गाजत येणारा हा गणपती यंदा माञ साधेपणाने आणला जाणार आहे.

हेही वाचा- म्हणून कोकणातला हा बंधारा झाला शांत.. -

जोशी घराण्यातील व्यक्ती कोरोनामुळे उत्सवाला येणार नाहीत यामुळे यंदा दत्ता साठ्ये यांचेकडे उत्सवाची जबाबदारी देण्यात आली आहे.दत्ता साठ्ये,मनोज जोशी,कांता घाणेकर व सहकारी हे मोजक्याच लोकांना घेवून ही परंपरा सांभाळणार आहेत.काही मोजकेच विधी होणार आहेत.पंतजोशी यांच्या गणपतीबरोबरच माणिक चौक येथील श्रीकांत जोशी यांच्या निवासस्थानी २० तारखेला गणेशाचे साधेपणाने आगमन होणार आहे.चतुर्थीला घरगुती गणरायांचे आगमन होणार आहे.

हेही वाचा- ....अन्यथा पुन्हा 7 दिवसाचा लॉकडाऊन ; जिल्हाधिकार्‍यांचा इशारा -

आम्ही शासनाचे नियम पाळुनच हा गणेशोत्सव साजरा करणार आहोत.सामुदायिक होणारे सर्व विधी रद्द करुन परंपरा टिकवण्यासाठी ठराविक विधी केले जाणार आहेत तसेच महाप्रसादही रद्द करणार आहोत.
 दत्ता साठ्ये,मुख्य पुरोहित,देवरुख

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first Ganpati celebrated in Sangameshwar taluka on Thursday