coronavirus : रेल्वे विभागाचेही ‘गो कोरोना’ अभियान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

भुसावळ : कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी मध्य रेल्वेने व्यापक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व स्तरांतून या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. यासाठी नियंत्रण कक्षांची स्थापना करण्यात आलेली असून, सतर्कता म्हणून वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

क्‍लिक करा -coronavirus : कोरोनामुळे अजिंठा लेणी पडली ओस

कोरोना व्हायरस संदर्भात उपाययोजना म्हणून येथील रेल्वे स्थानकावर आणि गाड्यांमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये जनजागृतीपर पोस्टर्स आणि पत्रके लावण्यात आली आहे. जनजागृती करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना ऑडिओ व व्हिडीओ क्लिप्स दाखविल्या जात आहेत. स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये उद्‌घोषणा केल्या जात आहेत. रेल्वे रूग्णालयास कोरोना विषाणूच्या संशयास्पद घटनांचा उपचार करण्यासाठी आवश्यक व संरक्षणात्मक उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी वेगळे वॉर्ड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना आजाराचा संशयीत रूग्ण आढळल्यास अथवा नोंदवले गेल्यास तातडीने रेल्वे रूग्णालय, आरोग्य युनिटमध्ये किंवा रेल्वे बोर्ड व स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांना कळविण्याच्या सूचना डिआरएम गुप्ता यांनी दिल्या. रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित राज्य अधिका-यांशी सतत संपर्क ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अशा राज्य अधिकाऱ्यांनी सुचविलेले या विषयावरील मार्गदर्शक सूचना, आणि माहितीद्वारे आवश्यक शोध, प्रतिबंध व उपचारात्मक उपाय केले जातील. रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना देखील तातडीने आवश्यक कारवाईसाठी जागरुक राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona virus railway bhusawal devison go corona abhiyan