
किरीट सोमय्या हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. 2014 च्या लोकसभा निवडुकीत किरीट सोमय्या हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणून आले होते. त्यानंतर त्यांना 2019मध्ये मात्र पक्षाने उमेदवारी नाकारली. शिवसेना आणि पक्ष नेतृत्त्वावर त्यांनी यापूर्वी कडाडून टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर शिवसेना प्रचंड आक्रमक झाली होती. या आक्रमकतेमुळेच त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. त्यांनी पदवीसह सनदी लेखापाल (सीए) पदवी त्यांच्याकडे आहे. त्यांनी 1975 मध्ये विद्यार्थी चळवळीतही सहभाग घेतला होता. त्यांनी 1995 मध्ये मुलुंड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा 43,527 मतांनी विजय झाला होता. त्यांनी 1999 मध्ये काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांच्याशी लढत झाली होती. तेव्हा त्यांनी कामत यांचा पराभव करत खासदार म्हणून निवडून आले होते.