esakal | अमेरिकेतही गणपतीबप्पाचा गजर, वेस्टलॅण्ड मित्रमंडळाचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

अमेरिकेतही गणपतीबप्पाचा गजर, वेस्टलॅण्ड मित्रमंडळाचा पुढाकार

sakal_logo
By
मंगेश शेवाळकर

हिंगोली - उच्च शिक्षणानंतर अमेरिकेत गेल्यानंतरही भारतीय संस्कृतीची नाळ कायम ठेवणाऱ्या भारतातून नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या वेस्टलँण्ड मित्र मंडळाने गणेशमुर्तीची विधिवत स्थापना केली आहे. त्यामुळे गणपतीबप्पाचा गजर अमेरिकेतही सुरू आहे. 

भारतामधे उच्च शिक्षण घेऊन विविध देशांमधे नोकरीच्या निमित्ताने गेलेले अनेक भारतीय आहेत. अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहून देखील भारतीय संस्कृतीची नाळ कायम ठेवली आहे. अमेरिकेतील मिचीगन राज्यातील वेस्टलँण्ड शहरात राहणाऱ्या विवेक चौधरी, गितांजली पाटणकर, रवी सोनी, विक्रांत देशमुख, सुषमा देशमुख, अद्वैत कुलकर्णी, महेश भुतडा, मेघा गिल्डा यांच्यासह तरुणांना एकत्र येऊन वेस्टलँण्ड मित्र मंडळ स्थापन केले आहे. या मित्रमंडळाच्या माध्यमातून नवरात्र, दसरा महोत्सव, गोकुळाष्टमी, संक्रांत आदी सण साजरे केले जातात. मागील पाच वर्षापासून गणेशोत्सव देखील सुरु केला आहे. गणेशोत्सवाची चार दिवस पुर्वी पासूनच तयारी केली जाते. त्यात सजावटीचे साहित्य तयार केले जाते. यावर्षीही गणेशमुर्ती स्थापन केली असून दररोज सकाळी व संध्याकाळी सर्वच जण आरतीसाठी न चुकता राहतात. तेथे पटेल ब्रदर्स या दुकानातून गणेशमुर्ती घेऊन विधिवत स्थापना करण्यात आली आहे. दहा दिवस दररोज नवीन पदार्थ तयार करून त्याचा प्रसाद दिला जात असून त्यातून एकमेकांच्या भेटी होतात शिवाय नवीन कोणी आले काय याची माहिती तसेच एकमेकांची ख्याली खुशालीची माहिती मिळत आहे. मित्रमंडळाच्या या उपक्रमामुळे अमेरिकेतही गणपती बाप्पांचा गजर सुरु आहे.  

या मित्रमंडळाच्या माध्यमातून सर्व भारतीय सण साजरे केले जातात. गणेशोत्सव सर्वांचा आवडीचा उत्सव. बच्चेकंपनी देखील याची वाट पाहतात. दररोज दहा दिवस एकमेकांच्या गाठीभेटी व गणरायाचे दर्शन यामुळे मन प्रफुल्लीत होते. तर अमेरिकेत राहिले तरी लहान मुलांवर भारतीय संस्कृतीची माहिती होणे आवश्यक आहे. या उद्देशानेच सर्व सण, उत्सव साजरे केले जातात. तसेच या भागात  राहणाऱ्या भारतीय नागरीकांचीही माहिती होते
लहान मुलांवर संस्कार आवश्यक - विवेक चौधरी, वेस्टलँण्ड (अमेरिका)