VIDEO : पाकिस्तानातील कराचीतही धूमधडक्‍यात गणेशोत्सव

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

मराठी लोकांनी बसवला दीड दिवसाचा गणपती 

औरंगाबाद - पाकिस्तानातील महत्त्वाचे शहर असलेल्या कराचीत मराठी माणसांची काही गणेश मंडळे आहेत. सगळे जण वाजत-गाजत गणपती बाप्पाचे स्वागतही करतात आणि दीड दिवसाच्या गणरायाचे भव्य मिरवणुकीने विसर्जनही करतात. यावर्षीही हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आल्याचे तेथील महाराष्ट्र पंचायतीचे विशाल राजपूत यांनी सांगितले. 

फाळणीनंतरही पाकिस्तानातच कायम राहिलेले सुमारे 600 ते 700 मराठी भाषिक लोक कराची शहरात आहेत. त्यांनी मराठी संस्कृती जपण्यासाठी 1982 मध्ये महाराष्ट्र पंचायत नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेमार्फत दरवर्षी गणेशोत्सव साजरा होतो. मद्रास पाड्यातील मूर्तिकारांकडून ही मंडळे गणेशाच्या मूर्ती बनवून घेतात. याशिवाय काही जण घरीही हाताने गणपती बनवितात. महाराष्ट्र पंचायतीच्या गणेशोत्सवासाठी मराठी कुटुंबीयांकडून वर्गणी जमा केली जाते. मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून गणेशाचे विससर्जन केले होते. यंदा प्राण सुरेश नाईक यांच्या हस्ते मानाच्या गणेशाची पूजा करण्यात आली. या पूजेच नाईक कुटुंबीयही सहभागी झाले होते, असेही श्री. राजपूत यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival in Pakistan