esakal | सावधान : कारण नसताना बाहेर पडाल तर, ७५ हजार दंड
sakal

बोलून बातमी शोधा

America-Lockdown

अमेरिकेतही कोरोनानाने हाहाकार उडवल्याने अमेरिकेत असलेले अनेक महाराष्ट्रीयन सध्या आपआपल्या घरातच दोन आठवड्यांपासून क्वारंटाईन झाले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये इंटेरिअर डिझाईन इंजिनीअर असलेले 'अभिजीत होशिंग, त्यांची पत्नी व दोन लहान मुली असा परिवार मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहरात राहतात. गेली दोन आठवडे आपण घरात बसूनच कामकाज करत आहोत पण त्यांची पत्नी सौ सुमेधा होशिंग ह्या अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये 'कोविद-१९ फ्रंट लाईन वर्कर' टीम मध्ये रोज १२-१५ तास काम करत आहेत.

सावधान : कारण नसताना बाहेर पडाल तर, ७५ हजार दंड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अमेरिकेतही कोरोनानाने हाहाकार उडवल्याने अमेरिकेत असलेले अनेक महाराष्ट्रीयन सध्या आपआपल्या घरातच दोन आठवड्यांपासून क्वारंटाईन झाले आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये इंटेरिअर डिझाईन इंजिनीअर असलेले 'अभिजीत होशिंग, त्यांची पत्नी व दोन लहान मुली असा परिवार मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहरात राहतात. गेली दोन आठवडे आपण घरात बसूनच कामकाज करत आहोत पण त्यांची पत्नी सौ सुमेधा होशिंग ह्या अमेरिकेतील हॉस्पिटलमध्ये 'कोविद-१९ फ्रंट लाईन वर्कर' टीम मध्ये रोज १२-१५ तास काम करत आहेत. अभिजीत ह्यांना त्यांच्या पत्नीचा सार्थ अभिमानहि वाटतो व थोडीशी चिंताही कारण डेट्रॉईट शहरात कोरोना झपाट्याने फैलावत असल्यामुळे त्यांना निर्जंतुकरन खूप कटाक्षाने करावे लागते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डेट्रॉईट शहर हे जागतिक ऑटोमोबाईल हब असल्यामुळे येथे जगातील सर्वच नावाजलेले ऑटोमोबाईल कंपन्यांचे रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटर्स, असेम्ब्ली प्लांट्स व त्यांच्या सप्लायर्सचे मोठ्या प्रमाणात जाळे आहेत. तसेच अनेक युनिव्हर्सिटीस असल्यामुळे इथे परदेशी व इतर राज्यातील पाहुण्यांचे नेहमीच खूप वर्दळ असते त्यामुळे ह्या शहरात व जवळील शहरात कोरोना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फ़ैलावला आहे. सद्य स्थितीत मिशिगन राज्यात एकूण १७२२१ कोरोना पॉसिटीव्ह ग्रस्तांची नोंद झालेली आहे. व त्यात रोज १४००+ नवीन रुग्णांची वाढ होत आहे, आत्ता पर्यंत सुमारे ७२७ अमेरिकन लोक एकट्या मिशिगन राज्यात मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकेत सुरवातीला कोरोना बाबत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी थर्मोमीटर ने केली जायची पण बहुतेक संक्रमित झालेले प्रवाशांमध्ये कोरोना व्हायरस चे लक्षणे आढळुन न आल्याने त्यांना १०-१२ दिवसांनी ह्या रोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून आली व त्यांची चाचणी पण मोठ्या संख्येने घेण्यात सुरवात झाली त्यामुळे रोजच १००० च्या संख्येने रुग्ण वाढत चाललये आहे.

येथील प्रशासनाने दोन आठवड्यांपासून टेस्ट किट मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्यामुळे 'ड्राईव्ह थ्रू' टेस्टिंग व बहुतेक रुग्ण कोविद-१९ स्पेशलटी हॉस्पिटल्स मध्ये भरती होत आहेत. तसेच वेळीच 'लॉकडाउन' व 'वर्क फ्रॉम होम' केल्यामुळे पुढील लाखोंच्या संख्येत होणारे संक्रमण रोकु शकले पण सर्वच लहान बिझिनेस बंद केल्यामुळे ७ लाखापेक्षा अधिक लोक बेरोजगार हि व नेराश्याग्रस्त झाले आहेत. ह्या जागतिक संकटामुळे अमेरिकेतील लोकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढेल ह्या भीतीने काहींनी शस्रे व हत्यारे जवळ ठेवण्यास सुरु केले आहेत. येथील प्रशासनाने मोकाट फिरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई देखील चालू केली आहे. कोणी जर निष्कारण फिरताना दिसलाकी त्याला कमीतकमी १००० अमेरिकन डॉलरचा दंड (सुमारे ७५०००/- रुपये ) व ६ महिने अतिरेकी म्हणून तुरुंगवासाची शिक्षा त्यामुळे अशा लोकांवरती चांगलाच वचक ठेवण्यात आला आहे. आम्ही सरासरी १० दिवस झालेकी फक्त गरजेचे सामान आणण्यासाठी बाहेर पडतो त्यासाठी मॉल्स आस्थापनाने कमालीची 'सोशल व फिझिकल डिस्टन्स' ची मर्यादा कमीतकमी ६ फूट अशी रचना केली आहे व कार्ट वर निजन्तुक फवारणी करूनच ती ग्राहकांना दिली जाते. किंवा ग्राहकच स्वतःची खूप काळजी घेताना दिसतोय. येथे प्रत्येक जण मास्क घालूनच बाहेर पडतो व बाहेरून आणलेली भाजी व फळे पाण्याने स्वच्छ धूवूनच घेतली जाते.

जेव्हा माझे अमेरिकन सहकारी ऑनलाईन मीटिंग मध्ये भारतातील परिस्थीची चोकशी करतात तेव्हा त्यांना सांगतांना अभिमान वाटतो कि "भारतातील जागृत प्रशासनाने वेळीच काळजी घेतल्यामुळे खूप प्रचंड प्रमाणामध्ये कोरोना व्हायरसचे संक्रमण तेथील प्रत्येक राज्यातील प्रशासन व सुज्ञ नागरिक रोखू शकले" व इकडे बहुतेक मीडिया हाऊसेस मध्ये भारताची प्रशंसा करतात तेव्हा तुमचे सर्व नागरिकांचे कॊतुकच वाटते व भारतीय असल्याचा अभिमानच वाटतो. त्यामुळे अशीच व ह्यापेक्षाहि अधिक काळजी तुम्ही सर्वजण आणखी काही महिने घ्याल अशी माझी खात्री आहे. गो कोरोना गो!!