esakal | अमेरिकेतील क्‍युपरटिनो शहराच्या महापौरपदी भारतीय महिला
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेतील क्‍युपरटिनो शहराच्या महापौरपदी भारतीय महिला

अमेरिकेतील क्‍युपरटिनो शहराच्या महापौरपदी भारतीय महिला

sakal_logo
By
उल्हास हरी जोशी

अमेरिकेतील क्‍युपरटिनो शहहराच्या महापौरपदाचा म्हणजेच मेयर होण्याचा बहुमान सविता वैद्यनाथन या भारतीय महिलेला मिळाला आहे. त्या गेली 19 वर्षे क्‍युपरटिनोच्या रहिवासी आहेत. त्यांनी दिल्लीहून बी.ए. मॅथेमॅटिक्‍स व लखनौहून बी.एड. केले आहे. पुढे अमेरिकेत गेल्यावर त्यांनी सॅन ओजे युनिव्हर्सिटिमधून एम.बी.ए केले आहे. त्या डी ऍन्झा कॉलेजमध्ये मॅथेमॅटिक्‍स शिकवतात. तसेच त्यांनी बॅंकेत पण काम केले आहे. क्‍युपरटिनोमधल्या अनेक सोशल ऍक्‍टिव्हिटिजध्ये भाग घेतात. त्यांचे पती डॉक्‍टर असून त्यांना अनघा नावाची एक मुलगी आहे.

अमेरिकेतील क्‍युपरटिनो हे शहर अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमधील एक छोटेसेच पण महत्वाचे शहर आहे. केवळ 60 हजारच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या शहराने जगाच्या नकाशावर ठळक स्थान प्राप्त केले आहे. जगप्रसिद्ध ऍपल कंपनीचे मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर याच शहरात आहे. हे शहर म्हणजे ऍपलच्या स्टिव्ह जॉब्जचे शहर म्हणून ओळखले जाते. याच शहरात त्याची वाढ व शिक्षण झाले आणि याच शहरात त्याने वडिलांच्या घराच्या गॅरेजमधून ऍपल कंपनीची सुरवात केली. आज या शहरात आयबीएम, ओरॅकल सारख्या अनेक टेक्‍नॉलॉजी कंपन्यांची ऑफिसेस आहेत.

या शहराचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे या शहरातील शाळा अमेरिकेतील सर्वोकृष्ट शाळांमध्ये गणल्या जातात. त्यामूळे क्‍युपरटिनो "स्कूल डिस्ट्रिक्‍ट'ला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. अनेक लोक केवळ मुलांच्या शिक्षणासाठी म्हणुन या शहरात स्थलांतरीत होत असतात. फोर्ब्ज मासिकाच्या सर्वेक्षणाप्रमाणे क्‍युपरटिनो हे अमेरिकेतील उच्च शिक्षीत लोकांची सर्वाधिक टक्केवारी असलेले शहर आहे. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या शहरातील लोकसंख्येपैकी 60 टक्के लोकसंख्या एशियन लोकांची असून यामध्ये चिनी व भारतीय लोकांची संख्या सर्वात जास्त आहे.

आज अनेक भारतीय अमेरिकेमध्ये उच्च पदी काम करत आहेत. क्‍युपरटिनोसारख्या महत्वाच्या शहराच्या महापौरपदी निवड होऊन सविता वैद्यनाथन यांनी भारतीयांची मान अजून उंचावली आहे. त्यांच्या कारकिर्दीला भरभरून यश लाभो हीच माझी सदिच्छा!