esakal | न्यु जर्सीत घुमले 'आनंद तरंग'चे स्वर   
sakal

बोलून बातमी शोधा

pune.jpg

पुणे : अमेरिकेतील "न्यु-जर्सी' मध्ये रविवारी (ता. 24) "आनंदाचे डोही आनंद तरंग' या भक्तीगीतावर मराठी बांधवांनी ठेका धरला. निमीत्त होते संत श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याचे. नॉर्थ ब्रन्सविक येथील साई मंदिरामध्ये दुपारी दोन वाजता भक्त परिवाराने उत्साहात महाराजांचा प्रकटदिन साजरा केला. श्रींच्या पादुका पुजनाने पालखी सोहळ्यास सुरवात झाली.

न्यु जर्सीत घुमले 'आनंद तरंग'चे स्वर   

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : अमेरिकेतील "न्यु-जर्सी' मध्ये रविवारी (ता. 24) "आनंदाचे डोही आनंद तरंग' या भक्तीगीतावर मराठी बांधवांनी ठेका धरला. निमीत्त होते संत श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याचे. नॉर्थ ब्रन्सविक येथील साई मंदिरामध्ये दुपारी दोन वाजता भक्त परिवाराने उत्साहात महाराजांचा प्रकटदिन साजरा केला. श्रींच्या पादुका पुजनाने पालखी सोहळ्यास सुरवात झाली.

भजनाच्या भक्तीमय स्वरांत महिलांच्या लेझीमचा झंकारामुळे सोहळ्याला सुमधुर स्वरुप प्राप्त झाले. अस्सल मराठमोळ्या वातावरणात पारंपारिक पद्धतीने श्‍लोकांचे आणि गजानन विजय या ग्रंथाचे पारायन करण्यात आले. श्रींचा प्रसाद म्हणून अस्सल पिठल-भाकरिचा बेत महाप्रसादासाठी करण्यात आला होता. या मंगलमय सोहळ्याला 'न्यु जर्सी' मधील सुमारे तिनशे मराठी बांधवांनी हजेरी लावल्याचे श्रावणी लाभे आणि निलीमा जेवळीकर यांनी सांगितले.