esakal | 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर सातासमुद्रापार..!
sakal

बोलून बातमी शोधा

dhol tasha pathak at edinburgh for ganesh festival 2019

'गणपती बाप्पा मोरया'चा गजर सातासमुद्रापार..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एडिनबर्ग : अमेरिकेमधल्या एडिनबर्ग शहरातही ढोल ताशांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मोठ्या उत्साहात गणेशबाप्पाची प्रतिष्ठापना करून सातव्या दिवशी निरोप देण्यात आला. गणेशोत्सव मिरवणुकीने सगळेच जण भारावून गेले होते.

भारतात ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे भारताबाहेर सातासमुद्रापार अमेरिकेतही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतोय.

भारतातील मराठी भाषिक लोक अमेरिकेत कामानिमित्त वास्तव्य करतात. अमेरिकेत काम करतांना भारतीय संस्कृती जतन करताना भारतीय दिसत आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील मराठी लोक आपल्या परिवारासह अमेरिकेच्या एडिनबर्ग शहरात आहेत. 

2016 पासून इथल्या मराठी लोकांनी सण साजरे करण्याची प्रथा चालू केली. सर्वात पहिले मकरसंक्रांत साजरी करताना भारतीयांचा एक व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपमार्फत सर्व सदस्य एकत्र येऊन भारतीय तसेच मराठी सण साजरे करतात. या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होतात. गणपती बाप्पाचे विसर्जन करताना पारंपारिक ढोल पथक तसेच लेझीम आणि फुगडी खेळत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.