esakal | लंडनमध्ये कला सादर करताना संचारतो जोष...
sakal

बोलून बातमी शोधा

london marathi sammelan 2017

लंडनमध्ये कला सादर करताना संचारतो जोष...

sakal_logo
By
संतोष धायबर

लंडनच्या भूमिमध्ये येऊन आपली कला सादर करताना एकप्रकारचा जोष संचारतो. लंडन मराठी संमेलनाच्या (एलएमएस-2017) कार्यक्रमात कला सादर केल्यानंतर मराठी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

'एलएमएस'च्या 85व्या वर्धापनदिनानिमित्त 2, 3 व 4 रोजी येथील वॉटफर्ड येथील वॉटफर्ड कलोझियम थिएटरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने येथे विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले, गायिका आर्या आंबेकर, गायक हृषीकेश रानडे, नंदेश उमप व समीर चौगुले यांनी आपली कला सादर केली. रसिकांनी त्यांच्या कलांना उत्फुर्तपणे दाद दिली.

'युके'मध्ये भारत-पाकिस्तानचा सामना सुरू असतानाही मराठी बांधवांनी कार्यक्रमासाठी गर्दी केल्याचे पाहून आनंद झाला. लंडनमध्ये आपली कला सादर करण्याचे हे सलग तिसरे वर्षे आहे. ही हॅटट्रीक साधत असताना आमच्या कलेला मोठी दाद मिळत असल्याचे मोठे समाधान आहे, असे अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने सांगितले.

आर्या आंबेकर म्हणाली, 'लंडनमध्ये मराठी परंपरा जपली जात आहे. आम्हाला आमंत्रित करून येथे कला सादर करायची संधी मिळते ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. येथे येऊन मराठी गाणी गायला खूप आवडते.'

'लंडन मराठी संमलेनामध्ये आमची कला सादर होतेय ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमची कला जुन्यांबरोबरच नव्या पिढीसमोर पोहचते ही मोठी गोष्ट आहे. लंडनस्थित सर्व मराठी नागरिक कार्यक्रमला येऊन आमच्या कलेला दाद देतात, यापेक्षा मोठा आनंद तो कसला असणार', असे हृषिकेश रानडेने सांगितले.

नंदेश उमाप म्हणाले, 'लंडनच्या भूमिमध्ये सांस्कृतीक सुवास दरवळतोय. येथील मराठी बांधवांनी परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परदेशात येऊन आम्हाला कला सादर करण्याची संधी मिळते आणि रसिक ते लुटतात याचा आनंद होतो. शिवाय, आपली माणसं येथे भेटल्याने महाराष्ट्रात असल्यासारखे वाटते.'

लंडनमध्ये आल्यानंतर मोठा भाऊ भेटल्याचा आनंद होतो. खरोखरच आमच्या कलांना येथे मोठी दाद तर मिळतेच शिवाय प्रेमही मिळते, असे समीर चौगुले यांनी सांगितले.