लंडनमधील मराठीजन घेणार 'गाव दत्तक योजने'त सहभाग

Tuesday, 6 June 2017

लंडन : भारत विकास ग्रुपचे (बीव्हिजी) अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेचे फायदे सांगितल्यानंतर लंडनवासीयांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले. यामुळे एक प्रकारे परदेशात राहून देशसेवा करण्याचे भाग्य लाभणार असल्याचे अनेकांनी सांगितले.

लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या 85व्या वर्धापनदिनानिमित्त गायकवाड यांच्याशी संवाद साधण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष सुशील रापतवार यांनी गायकवाड यांच्याशी संवाद साधला. गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेबरोबरच विविध योजनांची माहिती देत लंडनवासीयांची मने जिंकली.

लंडन : भारत विकास ग्रुपचे (बीव्हिजी) अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेचे फायदे सांगितल्यानंतर लंडनवासीयांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले. यामुळे एक प्रकारे परदेशात राहून देशसेवा करण्याचे भाग्य लाभणार असल्याचे अनेकांनी सांगितले.

लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या 85व्या वर्धापनदिनानिमित्त गायकवाड यांच्याशी संवाद साधण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष सुशील रापतवार यांनी गायकवाड यांच्याशी संवाद साधला. गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेबरोबरच विविध योजनांची माहिती देत लंडनवासीयांची मने जिंकली.

महाराष्ट्रात गाव दत्तक योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. हरबल नॅनो टेक्नोलॉजीमुळे अनेक शेतकऱयांचे उत्पन्न एक वर्षात 50 ते 200 टक्क्यांनी वाढविले आहे. शिवाय, दुभत्या गायी, म्हशींचेही उत्तपन्न वाढले आहे, याबाबतची माहिती गायकवाड यांनी दिल्यानंतर अनेकांनी आम्हाला आमच्या मायभूमीसाठी काही तरी करायचे आहे. परंतु, काय करावे हे समजत नव्हते. गाव दत्तक योजनेमध्ये आम्ही सहभागी होणार असल्याचे अनेकांनी सांगितले. गाव दत्तक योजनेमुळे आमच्या गावासाठी खऱया अर्थाने आम्हाला काही तरी करता येणार आहे. वर्षातून एकदातरी आम्ही आमच्या गावाला भेट देतो. परंतु, गावातील शेतकऱयांची परिस्थिती पाहून गहिवरायला होते. गाव दत्तक योजनेमुळे लंडनमध्ये राहून गावासाठी आता काहीतरी करता येणार आहे, असे लंडनस्थित भारतीयांनी सांगितले.

एकी हेच बळ...
युके आणि लंडनमध्ये रहात असलेल्या भारतीयांनी एकत्र येऊन अनेक उपक्रमांबाबतची माहिती दिली. मोटारी, घर खरेदी करण्याबरोबरच विमा एकत्रीतपणे उतरवल्यास सर्वांनाच मोठा फायदा होऊ शकेल. या फायद्यामधील काही रक्कम लंडन महाराष्ट्र मंडळाला दिल्यास मंडळही आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल, असे एकी हेच बळ या म्हणीचा अर्थ गायकवाड यांनी सांगितल्यानंतर अनेकांनी जागेवर उभे राहून टाळ्या वाजवत उत्फुर्त प्रतिसाद दिला.

गायकवाड यांना गराडा...
गायकवाड यांचे भाषण झाल्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. भाषणानंतर गायकवाड यांच्याभोवती अनेकांना गराडा घातला. एकमेकांचे व्हिजिटींग कार्डचे आदान-प्रदान करत विविध योजनांमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.

गरीबी ते उद्योजक प्रवास...
सातारा जिल्ह्यातील गायकवाड यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून कामाला सुरवात केली. नोकरीमधून बाहेर पडल्यानंतर उद्योगाला सुरवात केली. स्वामी विवेकानंदाच्या प्रेरणेने बीव्हिजीची 20 वर्षांपुर्वी ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या हेतूने आठ जणांनी सुरवात केली. आज 70 हजारहून अधिक जण बीव्हीजीमध्ये काम करत आहेत. शिवाय, शेतकऱांच्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्यांना वाजवी भाव मिळण्यासाठी सातारा मेगा फूड पार्क चालू केली आहे. याबरोबरच जगभरात सोलर पार्कचे 300 मेगावॉटचे काम सुरू आहे.

गायकवाड यांचे भाषण ऐकून सार्थक झाले...
गायकवाड यांचे भाषण ऐकून अनेकांना गहिवरून आले. स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणास्थान असलेले गायकवाड हे स्वःत अनेकांचे प्रेरणास्थान झाले आहे. मंडळाच्या कार्यक्रमात गायकवाड यांचे भाषण ऐकून सार्थक झाल्याचे अनेकांनी सांगितले.

'बीव्हिजी'ची डायल क्रमांक 108 :

  • तीन वर्षांत 15 लाख 60 हजार रुग्णांना मदत
  • 14781 मुलांचा रुग्णवाहिकेत जन्म
  • अपघाग्रस्त 1 लाख 88 हजार 860 जणांना मदत
  • मध्य प्रदेशातही पोलिस इमरजन्सी रिस्पॉन्स सव्हिस बीव्हिजी चालवते. त्यामध्ये आजपर्यंत 25 लाखांहून अनेकांना मदत झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: London news pailteer London Marathi Sahitya Sammelan hanmant gaikwad