esakal | जस्ट वन मोर डे

बोलून बातमी शोधा

sahastrabuddhe-family
जस्ट वन मोर डे
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सिडनी - येथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या कुटुंबाने केलेल्या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले असून, या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकारानी संगळ्यांची पसंती मिळविली आहे. 

हा चित्रपट एका जवानाच्या कुटुंबाभोवती फिरणारा आहे. एका जवानाच्या कुटुंबाला केणत्या कोणत्या अडचणी येतात. त्यातून मार्ग काढताना होणारा त्रास या सगळ्याचे चित्रण यामध्ये केले आहे. विशेषत: या जवानाची पत्नि आणि तीचा वाढत्या वयातल्या मुलगा यांच्या भोवती या चित्रपटाचे कथानक फिरते. 

सिडनी येथे स्थायिक झालेल्या सहस्त्रबुद्धे कुटुंबाने या चित्रपटाची निर्मिती केली असून, 'जस्ट वन मोर डे' असे या चित्रपटाचे नाव आहे.

या चित्रपटाविषयी बोलताना सौ. पुनम सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, ''2016मध्ये या चित्रपटाच्या चित्रिकरणाची सुरुवात केली. जेव्हा आम्ही या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले तेव्हा सगळे कसे होईल याची कप्लना नव्हती. चित्रपटाचे चित्रिकरण हे विकऐंडला करावे लागायचे कारण शाळा आणि ऑफिस सगळं सांभाळून चित्रिकरण करावे लागायचे''. या चित्रपटासाठी साधारण 33 लाख रुपयांचा खर्च आल्याचेही त्यांनी सांगितले.  

भारतात असताना सौ. पुनम सहस्त्रबुद्धे यांनी चार दिवस सासूचे, पोपट झाला रे, दामिनी यासारख्या मराठी तर संबंध, अफलातून, ये दिल क्या करे सारख्या मालिकांमधून काम केले होते. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याची आपल्याला आवड असल्याचेही त्यांनी सांगितले. 

चार दिवस सासूचे या मालिकेत त्यांनी रोहिणी हट्टंगडी यांच्या मुलिची भूमिका केली होती.  

चित्रपटाला मिळालेले पुरस्कार
- बेस्ट यंग अॅक्टर अॅवॉर्ड - लॉस एंजेलिस फिल्म अवॉर्ड, लॉस एन्जेलिस, सीए, यूएसए 
- वबेस्ट यंग अॅक्टर पुरस्कार - न्यूयॉर्क फिल्म अवॉर्ड, न्यूयॉर्क, यूएसए
- वबेस्ट इंडी फीचर फिल्म - साउथ फिल्म्स अॅण्ड कला अकादमी फेस्टिवल चिली, साउथ अमेरिका
- बेस्ट फीचर फिल्म फॉर मंथ - एएबी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पंजाब, भारत
- सर्वोत्कृष्ट पटकथा - बार्सिलोनातील बार्सिलोना प्लॅनेट चित्रपट महोत्सव